महिला व गर्भवती स्त्रियांना अत्याधुनिक उपचार व आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हॉस्पिटलच्या स्त्री व प्रसुती विभागाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. वातानुकूलीत सुसज्ज प्रसुतीकक्ष, गुंतागुंतीच्या प्रसुती असलेल्या रुग्णासाठी विशेष कक्ष, २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, प्रसूतीपूर्व व प्रसुती पश्चात सेवा, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सोय आणि वेदनारहित प्रसूती सेवा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते या विभागाचा शुभारंभ झाला. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, प्र - कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. वसुधा सावंत, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, सीएचारओ श्रीलेखा साटम, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी हॉस्पिटलच्या नव्या प्रशासकीय विभागाचे उद्घाटन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूरवासीयांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध असून सर्व अत्याधुनिक उपचार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
चौकट : लवकरच सुसज्ज कार्डीओलॉजी विभाग….
येत्या काही महिन्यांत हॉस्पिटलचा बालरोग विभागही अद्ययावत केला जाणार आहे. त्याचबरोबर सुसज्ज कार्डीओलॉजी विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा व आसपासच्या परिसरातील लोकांना हृदयावरील आधुनिक उपचार येथे उपलब्ध होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
फोटो : ०६ डीवायपी
ओळी..... कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अद्ययावत स्त्रीरोग व प्रसुती विभागाचे उद्घाटन करताना संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा आदी उपस्थित होते.