यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची ही निवड कौतुकास्पद आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अडीच लाखांपासून दीड लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश नलवडे, विनायक चिंदके, अनिकेत पाटील ,तुषार पाटील, ओमकार पोळ, प्रथमेश डोंगळे, मोहम्मदसाद मुकादम, सिद्धिविनायक ज्वारे, श्रेयस पाटील, स्वरूप घाटगे, प्रणाली कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, चीफ टेक्निकल ऑफिसर प्रा. रमेश रणदिवे, उपप्राचार्य प्रा. मीनाक्षी पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. महेश रेणके, प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. सचिन जडगे, अनिल देशिंगे उपस्थित होते.
फोटो : १० डीवायपी निवड
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. संतोष चेडे, प्रा .रमेश रणदिवे, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा.नितीन माळी, आदी उपस्थित होते.