डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा १८ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यादिवशी या विशेष ओपीडीची सुरुवात होणार असून त्यापुढे दर बुधवारी ही सेवा उपलब्ध असेल. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि स्पाईन फौंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या समाजातील गरीब व गरजू रुग्णांसाठी या ओपीडीमध्ये मणक्याच्या आजारांबाबत मोफत तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर सवलतीच्या दरात सीटी स्कॅन व एमआरआय तपासण्या उपलब्ध होतील.
दर बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही विशेष ओपीडी सुरू राहील. यातील निवडक रुग्णांना दुपारी २ ते ४ या वेळेत टेलि कॉन्फरन्सिंगद्वारा मुंबईतील स्पाईन फौंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली.