कोल्हापूर : जनसेवा ही ईश्वरसेवा असून, चांगले कामाचे कौतुक सर्वत्र होते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. त्यासाठी आहार, चांगल्या सवयी व वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.गोवर रुबेला मोहीम यशस्वी करणाऱ्या संस्था, एन.जी.ओ. अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कुटुंब कल्याण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, सर्जन, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचा आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
मंगळवारी शाहू सभागृहात अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने, आरोग्य समिती सदस्य रेश्मा राहुल देसाई, सुनिता रेडेकर, पुष्पा आळतेकर, सचिन बल्लाळ, अनिता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले. सूत्रसंचालन सविता कुंभार यांनी केले, आभार डॉ. फारुख देसाई यांनी मानले.