इचलकरंजी : शहर व परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते. शासनाच्या नियमांचे पालन करत सर्वत्र शांततेत जयंती साजरी करण्यात आली.
स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पुष्पहार अर्पण करून नगरपालिकेच्या वतीने अभिवादन केले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे, प्रभारी मुख्याधिकारी दीपक पाटील, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाऊसाहेब आवळे, शहाजी भोसले, प्रकाश मोरबाळे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.
ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एम. के. कांबळे, अविनाश कांबळे, सुनील पाटील, अरुण आवळे, संजय केंगार, विलास गाताडे, प्रकाश सातपुते, राजू बोंद्रे, शेखर शहा, आदींसह पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.
भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी अमर कांबळे, धोंडिराम जावळे, पांडुरंग म्हातुकडे, राजेंद्र पाटील, नगरसेवक रणजित अनुसे, अश्विनी कुबडगे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शहर काँग्रेस समितीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमिला पाटील यांनी केले. यावेळी राज्य घटनेची जपणूक व डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, राजन मुठाणे, वेदिका कळंत्रे, आदी उपस्थित होते.
कोरोची (ता. हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये डॉ. देवानंद कांबळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अमर कांबळे, सावकार हेगडे, संस्थापक डॉ. प्रदीप पाटील, अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील, अनिकेत कांबळे, आदी उपस्थित होते.
समाजवादी प्रबोधिनीमध्ये नगरसेवक अजित जाधव यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कविवर्य सुरेश भट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, अशोक केसरकर, देवदत्त कुंभार, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, प्रा. कुबेर कट्टीमनी, आदी उपस्थित होते. दि न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रा. एस. डी. मणेर, पी. बी. कोळी, ए. बी. पाटील, एस. ए. बिरनाळे, एम. जी. आंबेकर, एस. एम. आंबेकर, महादेव शिंगे, पी. बी. कोळी, आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.
फोटो ओळी
१४०४२०२१-आयसीएच-०२
ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.