कुरुंदवाड : शहरातील मध्यवस्तीत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण पालिका प्रशासनाने हटवाो, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाबासाहेबांचा पुतळा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून, पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करावा; अन्यथा विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल ढाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. एक वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढले होते. मात्र, पुतळ्याभोवती भाजीपाला विक्रेते, हातगाडे, दुचाकी, चारचाकी वाहनांचा गराडा पडत असल्याने स्मारकाबरोबर स्मारकाचे सौंदर्य लोप पावत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने स्मारकाभोवतालचे अतिक्रमण हटवून पावित्र्य राखण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.
फोटो - ०९०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती वाहने आणि भाजीपाला विक्रेत्यांनी गराडा घातला आहे.