शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

डॉक्टररुपी देवमाणूस भेटले...श्रेयाचे पाऊल पुढे पडले; गरीब रुग्णावर महिनाभर केले मोफत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:46 PM

वडणगे (ता. करवीर) येथील केतन सर्जेराव पोवार याला श्रेयाची परिस्थिती समजल्यावर त्याने एक रुपयाही न घेतला रोज श्रेया व तिच्या आईसाठी डबा आणून दिला.

कोल्हापूर : श्रेया विश्वास गाडे (वय १५) ही शिये फाट्यावर मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलगी. दुपारी शाळेतून घरी येताना तिला एका दुचाकीने उडवले. तब्बल पाच महिने ती सीपीआरमध्ये होती. तिथे ती बरी झाली नाही. समाजातील काही चांगल्या लोकांच्या मदतीने तिला टाकाळ्यावरील अस्थिरोग सर्जन डॉ. राजेंद्र अभ्यंकर यांच्या पूर्वा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिन्याभराच्या उपचारानंतर श्रेया चालू लागली आणि बुधवारी तिला डिस्जार्च मिळाला. तिच्यावरील उपचाराचे तब्बल १ लाख ५२ हजार रुपये बिल झाले, परंतु डॉ. अभ्यंकर यांनी त्यातील एक पैसाही घेतला नाही. त्यांच्यासारख्या देवमाणसामुळेच श्रेयाचे पाऊल पुढे पडले.श्रेयाही टोप येथील वत्सला बापूसो पाटील माध्यमिक विद्यालयात नववीत शिकते. शाळेतून घरी येताना ४ डिसेंबरला तिला दुचाकी क्रमांक (एमएच ०९, एलटी ८३६)च्या स्वाराने उडवले. त्यात तिच्या डाव्या मांडीचे हाड मोडले. तशाच अवस्थेत तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर तिथे तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तब्बल पाच महिने ती उपचार घेत होती. परंतु, तिचा पाय बरा झाला नाही. उलट जखमेतील संसर्ग वाढला. अशीच स्थिती राहिली तर पाय काढून टाकावा लागला असता, ही बाब सांगली येथील संग्राम संस्थेच्या प्रमुख मीना शेषू यांना कुठून तरी समजली. त्यांनी मुलीचा पाय वाचवला पाहिजे, असा निर्धार केला व तिला १६ मे रोजी डॉ. अभ्यंकर यांच्या रुग्णालयात दाखल केले.त्यांनी स्वतंत्र रुम देऊन श्रेयाची व्यवस्था केली. तिच्या पायावर शस्त्रक्रिया केली व मायेच्या ममतेने उपचार केल्यामुळे तिची जखम बरी झाली. ती वॉकर घेऊन आता पाय टाकू लागली आहे. मीना शेषू यांनी डॉ. अभ्यंकर यांची भेट घेतली व उपचाराचा खर्च आपण करण्यास तयार असल्याचे सांगितले. ते ऐकून डॉ. अभ्यंकर यांनी हातच जोडले. माझ्या ज्ञानाचा, सेवेचा उपयोग अशा एखाद्या रुग्णासाठी करण्याची आपण मला संधी दिली, असे मी मानतो म्हणत त्यांनी एक पैसाही घेतला नाही. डॉ. अभ्यंकर हे अस्थिरोगतज्ज्ञांच्या महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष असून, आजपर्यंत पडद्याआड राहून त्यांनी अनेक रुग्णांना अशी मदत केली आहे. मदत केलेली या हाताची त्या हाताला कळता कामा नये, अशी त्यांची भावना आहे.

केतनला सलामच...श्रेयाचे कुटुंबीय शियेमध्ये राहत असल्याने दवाखान्यात जेवणाची अडचण आली. शोध घेतल्यावर वडणगे (ता. करवीर) येथील केतन सर्जेराव पोवार हा मुलगा डबे पोहोच करत असल्याचे समजले. त्याला श्रेयाची परिस्थिती समजल्यावर त्याने एक रुपयाही घेतला नाही. तो रोज श्रेया व तिच्या आईसाठी डबा आणून देत असे. श्रेयाची हाडाची शस्त्रक्रिया झाली असल्याने ती लवकर बरी व्हावी, यासाठी तो रोज उकडलेले अंडे, चिकन सूप द्यायचा. तब्बल २९ दिवस त्याने हे काम माणुसकीच्या भावनेने केले. त्याच्या या मदतीची किंमत करणे शक्य नाही.'लोकमत'कडून पाठपुरावाश्रेयाचे कौटुंबिकस्थिती खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासारखी नव्हती. म्हणून लोकमतने तिच्यावर आधी सरकारी रुग्णालयात चांगले उपचार कसे होतील यासाठी प्रयत्न केले. ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, बातमीदार भीमगोंड देसाई यांनी श्रेयाच्या सरकारी व खासगी उपचाराचा तीन महिने पाठपुरावा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर