शाहीर आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘स्वराज्याचे तोरण’ हा ऐतिहासिक पोवाडा गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. या पोवाड्यादरम्यान छत्रपती शिवाजीराजांचे संघटनकौशल्य, न्याय पध्दत व रयतेप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा याचे दर्शन या पोवाड्यातून उपस्थितांना घडविले.
कार्यक्रमाच्या मध्यावर रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पोवाड्यातून बालविवाह, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, स्पृश्य-अस्पृश्यता निवारण, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आदी विषयांना आपल्या शाहिरी वाणीतून स्पर्श केला. हल्लीची फॅशन आणि संस्कारहीन युवा पिढीवर प्रबोधनातून हल्ला चढविला. यावेळी त्यांना ओंकार सुतार (संगीत संयोजक), गुरू ढोले (ढोलक ढोलकी), सचिन जाधव (ऑक्टोपॅड), तसेच वडील पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, अरुण शिंदे यांची साथ लाभली.
तत्पूर्वी झी मराठी सा रे ग म प फेम सिद्धराज पाटील यांचा ऐतिहासिक गीतांबरोबरच भाव व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.