कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शिवाजी विद्यापीठात बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र- कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, आदी उपस्थित होते.
फोटो (१४०४२०२१-कोल-आंबेडकर जयंती (विद्यापीठ) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आदी उपस्थित होते.
===Photopath===
140421\14kol_1_14042021_5.jpg
===Caption===
फोटो (१४०४२०२१-कोल-आंबेडकर जयंती (विद्यापीठ) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आदी उपस्थित होते.