शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
3
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
4
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
5
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
6
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
7
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
8
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
9
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
10
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
11
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
12
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
13
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
14
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
15
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
16
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
17
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
18
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
19
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
20
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

नाटक समाजपरिवर्तनाचे एक सशक्त माध्यम

By admin | Published: August 19, 2015 12:13 AM

मंजुल भारद्वाज : नाट्यलेखन कार्यशाळेचा समारोप

कोल्हापूर : आता नाटकांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जाते. खरंतर ते समाजपरिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे. कोणतीही कला किंवा कलाकार हे वस्तू नाहीत, तर अभिव्यक्ती व्यक्त करणारी जिवंत माणसे आहेत. त्यांच्या माध्यमातून आदिम काळापासून सुुरू असलेल्या शोषणपद्धतीवर प्रहार करत समाजपरिवर्तन करणे हे ‘थिएटर आॅफ रिलेव्हन्स’चे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मंजुल भारद्वाज यांनी केले.भारतीय जीवनशैलीतील शोषणपद्धतीवर भारतीय जननाट्य संघ, थिएटर आॅफ रिलेव्हन्सच्यावतीने आयोजित नाट्यलेखन कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी लेखक व दिग्दर्शक मंजुल भारद्वाज, कलाकार अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर यांनी या चळवळीमागील भूमिका विशद केली. बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या चर्चात्मक कार्यक्रमात टीव्ही कलाकार अश्विनी नांदेडकर व कोमल खामकर म्हणाल्या, टी.व्ही. या ग्लॅमरस क्षेत्रात काम करताना एक कलाकार म्हणून तुमची घुसमट होते. स्वत:चे व्यक्तिमत्त्व हरवून काम करत राहावे लागते. या अस्वस्थतेतून बाहेर पडत कलेचे समाधान मिळविण्यासाठी ‘थिएटर आॅफ रिलेव्हन’ हे योग्य व्यासपीठ आहे. येथे कलेसाठी कला, कलेतले समाधान, व्यक्तिमत्त्वातला बदल आणि समाजपरिवर्तनाचे कार्य करत स्वत:चे वेगळेपण जपता येते. त्यामुळे अनेक व्यावसायिक नाटके नाकारत आणि या रंगभूमीवर स्वत:चे योगदान देत आहोत. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. या नाट्यलेखन कार्यशाळेत अनघा देशपांडे, तुषार म्हस्के, पंकज धुमाळ, हृषीकेश पाटील, प्रियांका राऊत यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास ‘छेडछाड का’ नाटकाचे कलाकार, रिंगण नाट्य चळवळीतील कार्यकर्ते व आयटक कामगार केंद्राचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)