उदगाव : इचलकरंजी शहरासाठी वारणेच्या अमृत योजनेच्या सर्व्हे करणाऱ्या अधिकाºयांना कोथळी ग्रामस्थांनी हाकलून लावूनही रविवारी ड्रोन कॅमेºयाद्वारे कृष्णा-वारणा संगमापासून कोथळी ते उदगाव दरम्यान काही लोक सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कोथळी ग्रामस्थांनी, ड्रोनच्या अधिकाºयांनाही हरीपूर येथून पळवून लावले आहे. हा प्रकार सुमारे दीड तास सुरूहोता. त्यामुळे कोथळी येथील वारणा-कृष्णा बचाव समितीने या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.मुंबई येथे ३१ मे रोजी वारणा बचाव समिती व इचलकरंजीचे पदाधिकारी यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत हरीपूर-कोथळी येथील वारणा-कृष्णा संगमाच्या दरम्यान अमृत योजनेची जागा निश्चित करण्याचे आदेश प्राधिकरण विभागाला दिले होते. त्यामुळे २ जूनला इचलकरंजीच्या अमृत योजनेचा सर्व्हे करण्यासाठी महाराष्ट्र प्राधिकरण विभागाचे अधिकारी कोथळीत दाखल झाले होते. यावेळी कोथळी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन अधिकाºयांना जाब विचारून त्यांना पळवून लावले होते.दरम्यान, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हरीपूर-कोथळी येथील वारणा-कृष्णा नदीच्या संगमापासून ड्रोन कॅमेरे आकाशात घिरट्या घालत असताना कोथळीच्या ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर शेतकºयांनी गावातील ग्रामस्थांशी संपर्क केल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्रित झाले. यावेळी ड्रोनचे कॅमेरे कृष्णा-वारणा संगमापासून कोथळी ते उदगाव दरम्यान तर कृष्णेच्या पलिकडील बाजूस हरीपूर ते अंकलीपर्यंतच्या बाजूस फिरताना दिसल्यानंतर हा अमृत योजनेचा सर्व्हे असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांना संपर्क करून जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या.तसेच काही ग्रामस्थ कोथळी येथून कृष्णेच्या होडीतून हरीपूर येथे पाहणीसाठी गेले असता ड्रोन कॅमेरे चालक व काही अधिकारी निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता ड्रोन कॅमेरा चालकासह अन्य व्यक्ती चारचाकीतून तत्काळ फरारी झाले. त्यावर कोथळी येथील कृष्णा-वारणा बचाव समितीकडून या प्रकाराचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी राजगोंडा पाटील, संजय नांदणे, श्रीकांत पाटील, शीतल पाटील-धडेल, भाऊसो मगदूम, श्रीकांत इसराण्णा, सुभाष पाटील, धनपाल इसराण्णा, अशोक लोहार, बाहुबली इसरण्णा, भीमगोंडा बोरगावे, सुकुमार नेजकर, किशोर पाटील, सागर पुजारी, देवगोंडा पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.तर ड्रोननेच पाणी न्याइचलकरंजीच्या अमृत योजनेसाठी कृष्णा-वारणा संगमावर काही अधिकारी रविवारी ड्रोन कॅमेºयाने सर्व्हेसाठी आले होते. यापूर्वी २ जून रोजी प्राधिकरण विभागाचे अधिकारी विनापरवाना येऊन सर्व्हे करीत होते. याला कोथळी ग्रामस्थांनी विरोध करीत या अधिकाºयांना हाकलून लावले आहे. सध्या पंचगंगा नदीचे प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी विनाकारण वारणा-कृष्णाकाठचा विरोध घेतला आहे. तो लवकरच दाखविलाही जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे आॅनलाईन उद्घाटन केले आहे. आता कोथळी येथे ड्रोन कॅमेºयाच्याद्वारे ग्रामस्थांच्या परवानाविना सर्व्हे केला जात आहे. जर ड्रोनने सर्व्हे करणार असाल तर ड्रोननेच पाणी न्या, असे वारणा-कृष्णा बचाव समितीने इचलकरंजीकरांना दिला आहे.ड्रोन पाडण्याचा प्रयत्नरविवारी सकाळी दहाच्या सुमारास कोथळीच्या नदीकाठावर ड्रोन फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकºयांनी ग्रामपंचायतीमध्ये फोन करून सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायतीवरील भोंगा करून ग्रामस्थांना जागरूक करून सर्व्हेबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी एकत्रित ग्रामस्थांनी ड्रोनला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ड्रोन कॅमेरे उंचावर असल्याने ग्रामस्थांना ते शक्य झाले नाही. अखेर नावेतून हरीपूर येथे जाऊन अधिकाºयांना हाकलून लावल्यानंतर ग्रामस्थांनी नि:श्वास घेतला.उदगावच्या पुलापर्यंत ड्रोनरविवारी सकाळी इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या सर्व्हेसाठी अधिकाºयांनीड्रोन कॅमेºयाचा वापर केला. यावेळी कोथळी-हरीपूर येथील वारणा-कृष्णा नदीच्या संगमापासून उदगाव येथीलहत्ती घाटाच्या मोठ्या डोहापर्यंत येऊनड्रोन कॅमेरा पुलाच्या बाजूने परत अंकलीकडील बाजूस जाऊन तो हरीपूरकडील बाजूस परत गेला.त्यामुळे आता कोथळी ते उदगावपर्यंतच्याजागेत अमृत योजनेचा सर्व्हेआखण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
‘ड्रोन’ सर्व्हे कोथळीकरांनी उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:56 AM