लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
उपआयुक्त निखिल मोरे यांनी शहरातील वर्दीळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी स्टेट बँक कॉलनी, बाबूराव साळोंखेपार्क, बळवंत नगर, रायगड कॉलनी, गुलाब नगर, सुभाषनगर, हनुमान गल्ली, राजेंद्रनगर, शास्त्रीनगर, पायमल वसाहत, जागृतीनगर, राजे संभाजी तरुण मंडळ, आपटेनगर, मोहिते गल्ली, रंकाळा रोड, ताराबाई रोड, उभा मारुती चौक, कनाननगर, कदमवाडी, विचारेमाळ, रमनमाळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, हिम्मत बहादूर परिसर, कसबा बावडा, आंबे गल्ली, एसपी बंगला, रेसकोर्स नाका, कामगार चाळ, वारे वसाहत, दुधाळी कोविड सेंटर, डोर्ले कॉर्नर, खरी कॉर्नर जाधवपार्क, उदयमनगर, सीता कॉलनी, सिध्दार्थनगर, शिवाजी पार्क झोपडपट्टी, डीओटी कोविड सेंटर, शिवाजी विद्यापीठ वसतिगृह, शाहू कॉलनी, जमादार कॉलनी, सुभाषनगर, भवानी मंडप, शुक्रवार पेठ, विचारेमाळ या ठिकाणी हायपो क्लोराईडची औषधाची फवारणी करण्यात आली.