ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन चाचणीअंतिम लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार
कोल्हापूर: जिल्ह्यात शुक्रवारी सीपीआर रूग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल,सेवा रूग्णालय कसबा बावडा आणि पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर ड्राय रन चाचणी घेण्यात आली.
सरकारने तारीख जाहीर केल्यानंतर अंतिम लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याआधी देशभरात एकाच दिवशी ही चाचणी घेण्यात आली आहे. कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयातील ड्राय रन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या उपस्थितीत झाली.येथील राजर्षि शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोयना इमारतीमध्ये सकाळी ९ वाजता ही चाचणी घेण्यात आली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, बालरोगतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरोदे, डॉ. संगीता कुंभोजकर, रणजित जाधव, मोहन राउत उपस्थित होते.