लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : दूधसाखर 下सह.载 पतसंस्थेला अहवाल सालात 下१९载 लाख 下५०载 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना 下१०载 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
बिद्री ((ता. कागल) येथील दूध साखर ग्रा.बि. शेती सह.पतसंस्थेच्या ४२ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या सभेत अनेक सभासदांनी सहभाग घेतला.या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले .
अध्यक्ष पाटील म्हणाले या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेकडे ठेवींचा ओघ वाढला असून शाखावाढी ची मागणी होत आहे सभासदांना पंधरा कोटींच्या वर कर्ज वितरण केले असून संस्था सक्षमपणे कार्यरत आहे .
प्रारंभी संस्थापक स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष शंकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक माजी जि प सदस्य भुषण पाटील यांनी केले. यावेळी भरत पाटील, आर आर किल्लेदार, सुनील पाटील. टी .के किल्लेदार , गणेश यादव ,पांडुरंग पाटील, विश्वास पाटील यांनी चर्चेत भाग घेतला . मॅनेजर पी.बी . कोंडेकर यांनी अहवाल वाचन केले. संचालक निवासराव घाडगे यांनी आभार मानले.
०२ बिद्री पतसंस्था
.
फोटो
बिद्री येथे दुधसाखर सह.पत संस्थेच्या आँनलाईन वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष बाबासाहेब पाटील व इतर