शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

एलबीटी बंदमुळे विकासकामे ठप्प

By admin | Published: August 14, 2015 11:40 PM

स्थायी सभेत नाराजी : केएमटी बसच्या दर्जाबाबत चौकशी करून कारवाई करणार

कोल्हापूर : एलबीटी सवलतीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर व वसुलीवर मोठा परिणाम झाला असून आयुक्तांनी मंजूर कामांसाठी निधी देण्याचे थांबविले आहे. त्यामुळे शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंजूर कामे थांबविणे योग्य नसल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. संभाजी जाधव यांनी शहरातील ५४ उद्यानांतून खेळणी आणि बाकडी बसविण्याचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावेळी एलबीटी रद्द झाल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. निधी नसल्याने कामे थांबविण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, निधी नसल्याचे कारण न सांगता काही तरी मार्ग काढा आणि खेळणी व बाकडी बसवा, अशी सूचना जाधव यांनी केली. शहरात आणि उपनगरांत उपनगरात सीसीटीव्ही बसवावेत, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. नवीन दाखल झालेल्या के.एम.टी. बसची चाके निखळून पडल्याने बसच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संगीता देवेकर यांनी केली. त्यावर चौकशी सुरू असून कारवाई निश्चित केली जाईल, असे सांगितले.