शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

सभासदाचे वाहन बंद केल्याने ‘कुंभी’वर पडसाद

By admin | Published: January 29, 2015 12:48 AM

काटा पाडला बंद : चंद्रदीप नरकेंच्या हस्तक्षेपानंतर काटा सुरू

कोल्हापूर : चार दिवस मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रकाश पाटील या सभासदाचे ऊस वाहतुकीचे वाहन राजकीय आकसापोटी अचानक बंद केल्याने ‘कुंभी बचाव मंच’ने शेती अधिकाऱ्यांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व वाहतुकीस पुन्हा परवानगी न दिल्याने वे-ब्रीजकडे कार्यकर्त्यांनी मोर्चा वळविला व काटा बंद पाडला. आमदार चंद्रदीप नरके यांनी वाहन सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.हंगाम २०१४-१५ साठी प्रकाश पाटील यांनी दोनचाकी ट्रॉली ऊस वाहतूक करार केला होता. गेले दीड महिना ते दोनचाकी ट्रॉलीने ‘कुंभी-कासारी’साठी वाहतूक करीत आहेत. मात्र, गेल्या सोमवारपासून त्यांचे ऊस वाहतूक करणारे वाहन शेती विभागाकडून अचानक बंद करण्यात आल्याचे पाटील यांना सांगण्यात आले. याबाबत प्रकाश पाटील यांनी शेती अधिकारी सुरेश अपराध यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहन दोन दिवसांत पुन्हा ऊस वाहतुकीसाठी घेऊ, असे आश्वासन दिले. मात्र, आठ दिवस झाले तरी पुन्हा ऊस वाहतूक करण्यासाठी शेती विभागाकडून सहकार्य होत नव्हते. ही बाब समजल्यामुळे ‘कुंभी बचाव मंच’ने कारखान्यावर येऊन शेती अधिकारी सुरेश अपराध, उपाध्यक्ष शामराव गोधडे व ज्येष्ठ संचालक यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी कारखाना प्रशासनाकडून योग्य उत्तर न मिळाल्याने मंचच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत वे-ब्रीजकडे मोर्चा वळविला व काट्यावर कार्यकर्त्यांनी ठाण मांडत सुमारे एक तास काटा बंद पाडला. यानंतर कुंभीचे अध्यक्ष आमदार चंदद्रीप नरके यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना आदेश देऊन वाहन तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण शांत झाले.