सडोली (खालसा) : हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाचे गेल्या दोन वर्षांपासून चार पिल्लर ढासळल्याने बंधारा अखेरची घटका मोजत आहे. त्यातच आठ दिवसांपासून परिते पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मोठे लाकूड व बांबूचे बेट व लाकूड अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ४० गावच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहेराधानगरीच्या लक्ष्मी तलावातून पाणी बाहेर पडल्यानंतर अग्रक्रमाने शेतीला पाणी मिळावे, यासह कोल्हापूर शहर, भोगावती नदीच्या काठावरील गावांना पिण्यास पाणी मिळावे, या दूरदृष्टीने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. तारळे, शिरगाव, राशिवडे, हळदी येथे हे बंधारे बांधल्याने साहजिकच हिरवाई फुलली. हळदी (ता. करवीर) येथील बंधाºयावर गेल्या दहा वर्षांत शासनाने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही चार पिलर ढासळल्याने बंधारा अखेरचा श्वास घेत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत आवाज उठवून बंधाºयाला निधी मिळावा, अशी मागणी केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून या बंधाºयात भोगावती नदीपात्रातून वाहून आलेले बांबूचे बेट व मोठे लाकूड अडकल्याने बंधाºयाला मोठा धोका निर्माण झाला आहे. याकडे परिते पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी मात्र दुर्लक्ष केल्याने या बंधाºयावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे.
हळदी बंधाऱ्याला बांबू बेट अडकल्यामुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:13 AM