लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवसेंदिवस कमी होणारे शेतीक्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेतकºयांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे आवाहन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी गुरुवारी येथे केले.शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव, प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी महाविद्यालयातील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषी सहसंचालक महावीर जंगटे प्रमुख उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, किमान वीस शेतकºयांनी एकत्र येऊन शंभर एकरांवर गटशेतीचा प्रकल्प हाती घेतल्यास शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत असल्याने हा प्रयोग शेतकºयांच्या जीवनात निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा आहे. कृषी तंत्रज्ञानाद्वारे लाभदायी शेती करण्यासह एकात्मिक पीक पद्धतीचा शेतकºयांनी अवलंब करावा. कृषी पदवीधराने एका गावाची जबाबदारी उचलून आधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचवावे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याकामी कृषी विभागाने आणि कृषी पदवीधारकांनी सक्रिय योगदान द्यावे. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम, शेतीनिष्ठ शेतकरी संजीव माने, आदी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांनी प्रास्ताविक केले. शतानंद लोमटे, प्रियांका शेवाळे, नीलोफर सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय तरडे यांनी आभार मानले. दरम्यान, उसावरील हुमणी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ लाखांचा निधी दिला आहे. त्यातून विकसित केलेल्या हुमणी कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉ. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे दर्शनया प्रदर्शनात १५ हून अधिक ऊस जातीचे वाण, विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाण, यांत्रिक औजारे, पिकांचे मूल्यवर्धन तंत्रज्ञान, औषधे, जैविक खते, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिके, कृषी औजारे मांडली होती. जैनापूरच्या शरद कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चरमधील विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पनांतून साकारलेले शेंगा, मका सोलण्याचे, शेंगा फोडण्याचे यंत्र, स्प्रे मशीन, तर डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लसूण सोलणे, शहाळे सोलणे आदी यंत्रे प्रदर्शनात ठेवली होती. प्रदर्शन शनिवार (दि. १४)पर्यंत आहे.
‘गटशेती’तून संपन्नता साधावी-- के. पी. विश्वनाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:01 AM
कोल्हापूर : दिवसेंदिवस कमी होणारे शेतीक्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेतकºयांनी आर्थिक संपन्नता साधावी
ठळक मुद्दे कृषी तंत्रज्ञान महोत्सव; प्रदर्शनाचा प्रारंभ