शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

By admin | Published: April 24, 2017 1:04 AM

‘रूसा’कडून मदत : शिवाजी विद्यापीठात साकारले समावेशी शिक्षण संसाधन केंद्र

संतोष मिठारी ल्ल कोल्हापूरई-बुक्स, ई-जर्नल्स, आॅडिओ बुक्स, ब्रेल प्रिंटिंग, आदी अद्ययावत तंत्रज्ञानावरील साधने असणारे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र (रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन) शिवाजी विद्यापीठात सुरू झाले आहे. या केंद्रामुळे दक्षिण महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रुसा) हे केंद्र साकारण्यात आले आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत सुमारे २५० दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यातील दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रेल लायब्ररी’ विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात कार्यान्वित आहे. या ब्रेल लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त अद्ययावत आणि अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. त्याला ‘रुसा’ने १५ लाख रुपयांच्या निधीद्वारे आर्थिक मदतीचा हात दिला. त्यातून ग्रंथालयात समावेशी शिक्षण संशोधन केंद्र साकारले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी साधने या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली आहेत. शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘समावेश शिक्षण’ केंद्राचे सदस्यत्व मोफत दिले जाणार आहे. त्यांना इंटरनेटचा वापर, संगणक हाताळण्याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. या साधनांची उपलब्धताया केंद्रामध्ये ब्रेल पुस्तके, स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर असणारे संगणक, ब्रेल प्रिंटिंग, ई-बुक्स, ई-जर्नल्स, ई-डाटाबेसेस, ई-रिसोर्सेस, आॅडिओ बुक्स, वाय-फाय सुविधा, इंटरनेट, मॅग्निफायर, स्पेक्टॅकल्स, टेलिस्कोप, आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘रुसा’ने महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठासह शिवाजी कॉलेज अकोला, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) येथे या स्वरुपातील केंद्र साकारले आहे, शिवाय या केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये साकारले आहे.अभ्यासक्रमाचे ‘ब्रेल लिपी’मध्ये रूपांतरदिव्यांग (अंध, मूकबधिर, अस्थिव्यंगबाधित, गतिमंद) विद्यार्थ्यांसाठी हे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यापीठातील या केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञान असलेली साधने उपलब्ध करून दिली आहेत. अंध विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना अभ्यासक्रम, टेक्स्ट बुक हे ‘ब्रेल लिपी’ मध्ये रूपांतरीत करुन देण्याची सुविधा याठिकाणी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना संगणक वापरण्याचे प्रशिक्षण आणि त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.