लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासकीय कर्मचाºयांबरोबर नगरपालिका कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. त्यामुळे नगरपालिका कार्यालयात शुकशुकाट होता. नगरपालिकांमधील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोग, २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती, अनुकंपा धोरणाने नोकर भरती, कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढावा, आदी मागण्या केल्या आहेत. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल राज्यभरात नगरपालिका कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते.इचलकरंजी : नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्व कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार नेते ए. बी. पाटील, अण्णासाहेब कागले, शिवाजी जगताप, के. के. कांबळे, नौशाद जावळे, संजय कांबळे, सुभाष मोरे, संभाजीराव काटकर, धनंजय पळसुले, हरी माळी, विजय पाटील, संजय शेटे, दस्तगीर सादुले, आदींसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.गडहिंग्लज : सकाळी पालिका कार्यालयाच्या आवारात कर्मचाºयांची बैठक झाली. पालिका कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष व कामगार युनियनचे अध्यक्ष बापू म्हेत्री, नगरसेविका क्रांती शिवणे, वीणा कापसे, नाज खलिफा, रेश्मा कांबळे, सावित्री पाटील, शशिकला पाटील, श्रद्धा शिंत्रे, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.जयसिंगपूर / कुरुंदवाड : नगरपालिका कर्मचारी व अधिकाºयांनी एकदिवसीय सामूहिक रजा टाकून ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सर्वच रजेवर गेल्याने पालिकेमध्ये शुकशुकाट होता. कुरुंदवाड येथे पालिका कर्मचाºयांच्या आंदोलनाला नगराध्यक्ष जयराम पाटील, पदाधिकारी, नगरसेवक उदय डांगे यांनी भेटून पाठिंबा दिला.जयसिंगपूरमध्ये आंदोलनात उपमुख्याधिकारी किशोर बेर्डे, अनिल तराळ, एन. एस. पवार, मारुती कदम, रामचंद्र कुंभार, महादेव आंबी सहभागी झाले होते. कुरुंदवाडमध्ये मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, कर निरीक्षक नंदकुमार चौधरी, अजित दीपंकर, निशिकांत ढाले, शशिकांत कडाळे, राजू गोरे, रिजवान मतवाल, अमोल कांबळे, संतोष कांबळे, नामदेव धातुंडे, विनायक दळवी, अमोल गायकवाड, विजय ढाले, शेखर चव्हाण, देरल ढाले सहभागी झाले.कागल : कागल नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाल्याने पालिकेचे कामकाज दिवसभर बंद राहिले. मुख्याधिकारी टीना गवळी, कर्मचारी संघटनेचे कागल शाखा अध्यक्ष सुरेश शिंदे, नितीन कांबळे, अभिजित गोरे, नंदकुमार घाटगे, शरद पाटील, बाळासो माळी, सुरेश रेळेकर, विजय पाटील, आदींसह एकूण ९७ कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. नगराध्यक्षा माणिक माळी यांनी कर्मचाºयांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.मलकापूर : मलकापूर नगरपालिका कर्मचारी संघटनेने बुधवारी दिवसभर सामूहिक रजा आंदोलन केले. आंदोलनात सर्व कर्मचारी सामील झाले होते.पेठवडगाव : आंदोलनात मुख्याधिकारी अतुल पाटील, पालिकेचे कायम व कंत्राटी ७५ कर्मचारी, आदी सहभागी झाले होते. आंदोलनास नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, अजय थोरात, संतोष गाताडे, शरद पाटील, संदीप पाटील, जवाहर सलगर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.हुपरी : या आंदोलनामध्ये हुपरीचे मुख्याधिकारी तानाजी नरळे, कार्यालय निरीक्षक रामचंद्र मुधाळे, मिरासो शिंगे, किरण हुपरीकर, मिलिंद भोगले कर्मचारी सहभागी झाले होते.
कर्मचारी संपामुळे पालिकांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:23 AM