जत : दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील ताणतणाव व अतिउच्च रक्तदाबाने मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे जतचे तहसीलदार ज्ञानदेव मल्हारी कांबळे (वय ४२, रा. महसूल कॉलनी, जत) यांचे सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान उपचार सुरू असताना मिरज येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा व पत्नी असा परिवार आहे.सोमवारी सकाळी तहसीलदार कांबळे कार्यालयात गेले. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ते घरी आले; परंतु रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जतच्या प्रांताधिकारी कार्यालयातून त्यांना दूरध्वनी आला. त्यानंतर ते चालतच प्रांताधिकारी कार्यालयाकडे निघाले असता, निवासस्थानासमोरील प्रवेशद्वाराजवळ अचानक रस्त्यावर कोसळले. तेथील रिक्षाचालकांनी त्यांना तत्काळ घरी आणले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मिरजेतील मिशन रुग्णालयात आणले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मिशन रुग्णालय प्रशासनाला माहिती देऊन तत्काळ उपचार करण्याची सूचना केली. त्यामुळे तेथे त्वरित उपचार सुरू झाले; परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील ताणतणाव व अतिउच्च रक्तदाबाने मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेळप्रसंगी मोलमजुरी करून कांबळे यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जत येथे पूर्ण केले. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. १९८२ मध्ये प्रशिक्षणार्थी लिपिक म्हणून तहसीलदार कांबळे यांनी मिरज महसूल भवनामध्ये कारकिर्दीस सुरुवात केली. वरिष्ठ लिपिक, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार (पान ८ वर)
जतच्या तहसीलदारांचा अतिताणामुळे मृत्यू
By admin | Published: February 04, 2015 12:34 AM