शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षाव, आंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 6:21 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षावआंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका आणखी दोन दिवस धुके राहणार

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यंदा फेबु्रवारीपासूनच तापमान वाढत गेले आणि शेवटच्या आठवड्यात तर पारा चांगलाच वाढला; पण गेले दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, पहाटेपासून दाट धुक्याची झालर पाहावयास मिळत आहे.दाट धुक्याबरोबर बारीक-बारीक दवाचा वर्षावही झाला. ऐन कडाक्याच्या थंडीत जसे दाट धुके पसरते त्यापेक्षाही अधिक धुके पडत आहे. सोमवारी सकाळी तर अगदी फुटावरील दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे वाहनांना रस्त्यावरून जाताना कसरत करीतच पुढे जावे लागत होते.

सकाळी साडेनऊपर्यंत धुक्याची झालर बाजूला होत नाही. धुके आणि अंगाला झोंबणारे वाऱ्याचा त्रास नागरिकांना होत असून वयोवृद्धांना तर घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊनंतर सूर्यनारायणाने हळूहळू दर्शन दिले, दिवसभर ऊन राहिले; पण उन्हाचा चटका कमी झालेला दिसला.जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली असून, रविवारी कमाल तापमान ३२ तर सोमवारी ते ३५ डिग्रीपर्यंत राहिले. आगामी दोन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून बुधवारनंतर तापमानात वाढ होत जाईल.

धुक्यासह पडलेल्या थंडीने आंब्यांचा मोहर गळण्याची भीती आहे. मोहर गळती होईल; पण जो मोहर राहील, त्याच्या फलधारणेवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर दोडका, काकडी, कलिंगडे या वेलवर्गीय पिकांसह भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसणार आहे.

धुक्यामुळे अपघात वाढलेदाट धुके आणि त्यातील बारीक-बारीक दवामुळे निसरडा झालेला रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रणच असते. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

रुग्णसंख्येत वाढकडक उष्म्यानंतर एकदम थंडी पडल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ झालेली दिसते.

धुक्यामुळे विद्युत पुरवठा खंडितदाट धुके आणि दवामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तीन-चार तासांनंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान