शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवा ‘सलाईन’वर

By admin | Published: September 22, 2014 10:25 PM

बांबवडे आरोग्य केंद्र : दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना एकही कायमस्वरूपी अधिकारीनाही

रामचंद्र पाटील - बांबवडे -शाहूवाडी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बांबवडे येथील आरोग्य केंद्रातील चांगल्या रुग्णसेवेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे व हे केंद्र गोरगरीब लोकांसाठी तारणहार बनले आहे. परंतु, अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.बांबवडे आरोग्य केंद्रांतर्गत ३१ गावे व वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. एक केंद्र व एवढ्या गावांच्या संख्येमुळे या आरोग्य केंद्रात रुग्णांची नेहमीच गर्दी असते. साधारणपणे १२५ ते १७५च्या दरम्यान रुग्ण दररोज येत असतात. आठवडी बाजार गुरुवार दिवशी तर रुग्णालयात उभा राहण्याससुद्धा जागा नसते आणि अशी परिस्थिती असतानाही येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. याचा परिणाम म्हणून रुग्णांना सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. लोकांना येथे मिळणाऱ्या चांगल्या सुविधा त्याही खिशाला परवडणाऱ्या म्हणून लोक सर्व त्रास सहन करीत आहेत.या केंद्रात कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या येथे एकाही कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक नाही. तात्पुरती सुविधा म्हणून माण प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पी. पी. कुंभार यांना जवळपास एक वर्षापासून येथील पदभार दिला आहे. परंतु, दोन डॉक्टरांची आवश्यकता असताना एकाच डॉक्टराला १५० हून अधिक रुग्णांना वैद्यकीय उपचार देताना तारेवरची कसरत करावी लागते. यासह जिल्हा व तालुक्याच्या बैठका, इतरही प्रशासकीय कामकाज पाहावे लागते. अशावेळी सरुड येथील पथकातील डॉक्टरांना पाचारण करावे लागते.या केंद्रांतर्गत साळशी, सुपात्रे, पिशवी, कापशी, सौते, थेरगाव, गोगवे, शित्तूर ही उपकेंद्रे व सरुड येथील पथकाचा कारभार चालतो. सध्या येथे एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सहायक, औषधनिर्माता, एक आरोग्यसेविका, एक लिपीक, तीन परिचर, एक चालक व एक लॅब टेक्नीशियन अशी पदे कार्यरत आहेत, तर दोन वैद्यकीय अधिकारी, परिचर दोन, एक आरोग्य सहायिका आणि उपकेंद्रामध्ये नऊ आरोग्यसेवक व सेविका अशी पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात अव्वलबांबवडे आरोग्य केंद्राला महिला प्रसूतीचा जिल्ह्याचा सलग तीनवेळा प्रथम क्रमांक व राज्याचा सलग दुसऱ्यांदा दुसरा क्रमांक मिळाला. अगदी थोडक्या गुणात गतवर्षाचा राज्याचा पहिला क्रमांक हुकला. तो मान पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला मिळाला.शासनाकडे पाठपुरावातालुका वैद्यकीय अधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासंदर्भात जिल्हा व राज्य पातळीवर लेखी मागणीद्वारे पाठपुरावा केला आहे. परंतु, पदे भरण्याची प्रक्रियाच कुर्मगतीने सुरू असल्याने या नवीन नियुक्त्यांना शासनाच्या अडचणी येत आहेत.ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकताबांबवडे परिसराचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपचारादरम्यान मर्यादा येतात. अत्याधुनिक साधनसामग्री, स्वतंत्र विभाग, स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी अशा सुविधा मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचीच आवश्यकता आहे. यासाठी शासकीय व राजकीय पातळीवर ठोस पावले उचलली नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.