लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे १२ पैकी ६ तालुक्यांमधील पुरस्कार विभागून देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली.चार दिवसांपूर्वी पुरस्कारासाठी ३८ शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या होत्या. मात्र, सर्वच पदाधिकाºयांकडे शिक्षकांच्या पुढाºयांनी आणि अनेक शिक्षकांनीही जोरदार लॉबिंग केल्याने पदाधिकाºयांमध्ये एकमत होण्याची चिन्हे नव्हती.
पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे जाहीर करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद बोलाविण्यात आली. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार नसल्याने ती रद्द करण्याचे निरोप गेले.मात्र, पत्रकारांनी पुन्हा दोन दिवस सुट्ट्या आल्या. निर्णय झालाच आहे तर चर्चा वाढवता कशाला, अशी विचारणा करत आज नावे जाहीर करा, अशी सूचना दिल्यानंतर पुन्हा सर्व पदाधिकारी पाऊण तास एकत्र बसले आणि मग एकदा ही यादी जाहीर करण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले उपस्थित होते.
यापुढच्या काळात करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी दोन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी महाडिक यांनी सांगितले. या दोन तालुक्यांत हजारपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यातून एका शिक्षकाला पुरस्कार देणे संयुक्तिक ठरत नाही. त्यावर चर्चा होऊन ही संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वच शिक्षकांचे प्रस्ताव अतिशय चांगले होते. त्यामुळे निवड करताना स्पर्धा अटीतटीची होती. त्यामुळेच काही ठिकाणी विभागून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले......................पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणेतालुका शिक्षकाचे नाव शाळा शेराआजरा संगीता संजय शिंदे वि. मं. बेलेवाडी हु..भुदरगड आनंदराव भोसले केंद्रशाळा पिंपळगाव विभागूनलीना म्हापसेकर केंद्रशाळा पाटगावचंदगड सटुप्पा फडके वि. मं. आमरोळीगगनबावडा सुरेश निकम वि. मं. लोघेगडहिंग्लज दिगंबर गुरव वि. मं. करंबळीहातकणंगले विजयकुमार माने केंद्रशाळा कबनूर विभागूनअनिल सुतार वि. मं. लोकमान्यनगर, कोरोचीकरवीर संभाजी कांबळे वि. मं. म्हालसवडे विभागूनकिशोरी चौगले वि. मं. कन्या वाकरेकागल कृष्णात पाटील वि. मं. रामकृष्णनगर विभागूनसुनील गुरव वि. मं. बोरवडेपन्हाळा दत्तात्रय गुरव वि. मं. घोटवडे विभागूनसंजय बचाटे जीवन शिक्षण, कोतोलीराधानगरी पांडुरंग येरूडकर वि. मं. सावर्डे पा.शाहूवाडी शोभा पाटील प्राथ. शाळा पिशवी विभागूनविनायक हिरवे वि. मं. करूंगळेशिरोळ बंडू राऊत कन्या निमशिरगांवविशेष पुरस्कारकागल प्रकाश मगदूम वि. मं. वंदूर विभागूनकरवीर आकाराम कांबळे वि. मं. बालिंगे