शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

अधिकाऱ्यांमुळेच प्रकल्प रखडले : ‘स्थायी’त आरोप

By admin | Published: December 27, 2014 12:40 AM

चौकशीचे आदेश : उपायुक्तांच्या गाडीला ४७ हजारांचे कुशन

कोल्हापूर : पाईपलाईन, रस्ते विकास प्रकल्प, नगरोत्थान, आदी मोठ्या योजनांसाठी नेमलेली स्टेअरिंग कमिटी कागदावरच आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे कामही कागदोपत्रीच सुरू आहे. लांबलेल्या प्रकल्पांचा आर्थिक फटका महापालिकेला बसणार आहे, यास जबाबदार कोण? असा सवाल आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. उपायुक्तांच्या गाडीसाठी ४७ हजारांचे कुशन घेतले, याउलट आवश्यक असलेली जेट मशीन खरेदी मात्र पैसे नसल्याच्या कारणाने पुढे ढकलली जाते. या सर्व प्रकारांची चौक शी करण्याचे ‘स्थायी’ बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते.थेट पाईपलाईनसह अनेक मोठे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहेत. थेट पाईपलाईनबाबत उलटसुलट बातम्या येत असून, प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी सदस्यांनी केली. सल्लागार कंपनीच्या क्षमतेबाबत सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाटबंधारे विभागाने मंजुरी दिली आहे. वनविभागाच्या परवानगीचा प्रस्ताव सादर केला आहे.अधिकाऱ्यांची उधळपट्टीयापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत एका उपायुक्तांच्या चीन दौऱ्याच्या खर्चावरून बराच गोंधळ झाला होता. चीन दौऱ्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केले, याचा महापालिकेला पर्यायाने कोल्हापूरला काय फायदा झाला, त्याचा तपशील द्या, अशी मागणी सदस्य करीत होते. हे प्रकरण मिटेपर्यंत आता उपायुक्तांच्या गाडीच्या कुशनसाठी तब्बल ४७ हजारांच्या उधळपट्टीचा मुद्दा पुढे आला. अधिकाऱ्यांच्या उधळपट्टीचे पडसाद येणाऱ्या महासभेतही उमटण्याची शक्यता आहे.आठ दिवसांत जिल्हा परिषदेची परवानगी मिळेल. सार्वजनिक विभागाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती जल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.नगरसेवक व सदस्यांनी सुचविलेल्या जनहिताच्या अनेक बाबींत प्रशासन खोडा घालते. शहरात ड्रेनेज चोकअप झाल्यानंतर लागणाऱ्या मशीन खरेदीसाठी पैसे नाहीत, या कारणास्तव लांबणीवर टाकले. गेले वर्षभर जेट मशीनचा मुद्दा सदस्य उपस्थित करीत आहेत. याकडे सोपस्कारपणे दुर्लक्ष केले जाते. याउलट उपायुक्तांच्या गाडीसाठी ४७ हजारांचे कुशन खरेदी केले जाते. हा मुद्दा उपस्थित करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावरून बैठकीत खडाजंगी झाली. ४७ हजारांच्या उधळपट्टीबाबत अधिकारी निरुत्तर झाले. ही खरेदी नियमबाह्य असल्यास याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याची मागणी सदस्यांनी केली. या खरेदी प्रकाराची चौकशी करून नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश सभापती चव्हाण यांनी दिले. (प्रतिनिधी)