कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत ७०० एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने बंद असलेली एसटीची सेवा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यावर मर्यादा होती.
सिंधुदुर्गातून जिल्ह्याबाहेर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली अशा ठिकाणी ७ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपेक्षा हळूहळू जास्त प्रतिसाद प्रवाशांकडून एसटीला मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसटी सेवा सुरू केल्यानंतर केवळ तालुक्यात आगार पातळीवरच गाड्या सोडण्यात येत होत्या.
त्यानंतर पुढील टप्प्यात काही गावांमध्ये एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद या फेऱ्यांना लाभत नव्हता. त्यामुळे फेºयांची संख्या वाढविण्यात आली नव्हती.