कोल्हापूर : संततधार वृष्टीचा फटका एसटी बस सेवेला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७ मार्गांवरील सेवा पूर्णत: बंद झाली आहे. तर ३ मार्गांवर पर्यायी मार्गाचा अवलंब करीत सेवा पुरविली जात आहे, अशी माहिती एसटीच्या कोल्हापूर विभागातर्फे देण्यात आली.कोल्हापूर विभागातील सर्व १२ आगारांतील सेवा अतिवृष्टीमध्ये बाधित आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होत आहे. कोल्हापूर आगारातून पणजी, चंदगड, अनुस्करा, संभाजीनगर आगारातून पडसाळी, गोतेवाडी, गगनबावडा, गडहिंग्लजमधून चंदगड, आजगोळी, नेसरी, गारगोटीतून आजरा, मलकापूरमधून गावडी, चंदगड आगारातून बेळगाव, हेरे, कानुर, बुजवडे, कोल्हापूर, कागलमधून मुरगुड, पणजी, राधानगरीतून निपाणी, गगनबावड्यातून कोल्हापूर तर आजरा आगारातून आजरा ते चंदगड, दाभिल, किटवडे, बेळगाव, गडहिंग्लज, कोवाड आदी मार्गांवरील एसटी सेवा बंद आहे. तसेच इचलकरंजी आगारातून कुरूंदवाडला जाणारी बस लाट मार्गे सुरू आहे. गारगोटी आगाराची निपाणी बससेवा चिमगांव मार्गे तर आजरा आगाराची आजरा ते साळगांव बस सोहाळे मार्गे सुरू आहे. कुरुंदवाड आगारातून पणजी बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे दोन दिवसांत दहा लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.
दोन दिवसांतील नुकसान असे-शनिवारी (दि. २२) एकूण रद्द किलोमीटर- १७,८००बुडालेले उत्पन्न - ५ लाख ३ हजार २०६ रुपयेरविवारी (दि. २३) एकूण रद्द किलोमीटर - २१,३३२बुडालेले उत्पन्न : ५ लाख ८४ हजार ७१०