शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पाणीटंचाईग्रस्त देवाच्या डोंगरावर दुधाची गंगा

By admin | Published: March 26, 2017 10:05 PM

वर्गीस कुरीयनची गोष्ट : पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली

शिवाजी गोरे ल्ल दापोलीदापोलीतील देवाचा डोंगर या छोट्याशा खेड्यातल्या वर्गीस कुरीयनची गोष्ट आहे. भीषण पाणीटंचाई असल्याने जनावरांसाठी ओला चारा नाही. पाणीटंचाई जणूकाही गावाच्या पाचवीलाच पूजलेली. अशा या पाणीटंचाईग्रस्त गावातल्या धनगर वस्तीतून रोज ५०० लीटर दूध संकलित करून स्वत:बरोबरच इतरांनाही चार पैसे मिळवून देणाऱ्या बाबू बावदानेंची ही प्रेरणादायी कहाणी!सरकारी योजनांचा फायदा खऱ्या लाभार्थींपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत दगडालाही पाझर फोडण्याची जिद्द उराशी बाळगून झटत राहणाऱ्या बाबू बावदानेंची कहाणी सरकार काही करत नाही म्हणत स्वस्थ बसणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.दापोलीमधल्या देवाचा डोंगर गावातली ही धनगर वस्ती. समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच. येथे केवळ हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण सुरू असते. मग, ओल्या चाऱ्याचं तर दुर्भिक्ष्यच! अशा परिस्थितीतही बाबू बावदानेंचा दिवस पहाटे चारला सुरु होतो आणि मग लगबग सुरू होते दूध संकलनाची! धनगर वस्तीतल्या चाळीस कुटुंबांकडचं मिळून पाचशे लीटर दूध बाबूकडे जमा होतं, हे सगळं दूध घेऊन मग बाबू बावदाने तालुक्याला निघतात. पत्नी दिवसभर जनावरांची देखभाल करीत असते.कोकणात डोंगर - दऱ्यात राहणारा धनगर समाज आजही दुर्ल दुर्लक्षित आहे. एकीकडे पशुधन कमी होत असले, तरीही देवाच्या डोंगरावरील बाबू बावदाने या तरुणाच्या सहकार्याने दूधगंगा वाहात आहे. हेच दूध धनगर समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. या व्यवसायातून अनेकांची चूल पेटवण्याचा प्रयत्न बाबू बावदाने या तरुणाने केला आहे. प्यायला पाणी नाही, हिरवा चारा नाही, अशा प्रतिकूल परिस्थिती देवाच्या डोंगरावरील वाडीतून दिवसाला ५०० लीटर दूध तालुक्याला येत आहे.देवाच्या डोंगर येथील बाबू बावदाने या तरुणाची कहाणी. अख्खं कुटुंब पशुधन सांभाळण्यात गुंतलंय. बायको, आई दिवसभर जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करतात. जनावरांना चारा घालणे, त्यांचा सांभाळ करण्यात वडिलांचा दिवस जातो. बाबू सकाळी उठून दूध काढतो. वस्तीवरील सर्वांचे दूध संकलित करून वाहनाने तालुक्याला येतो.झेप घ्यायचीय : सरकारीबाबूंचा अनुभव चीड आणणारा...शेळ्या-मेंढ्यांचे पालन करून दूध-दुभते तयार करून विकणे, हेच उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं पशूधन सांभाळलं आहे. बाबूसारख्या जिद्दी तरुणाला या व्यवसायात खरंतर मोठी झेप घ्यायची आहे. सरकारी योजनांबद्दलचा बाबूचा हा अनुभव चीड आणणारा आहे.