शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

डफ कडाडला; कोल्हापूरच्या दसरा चौकाला स्फुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:00 AM

कोल्हापूर : ‘या सरकारनं बरं नाही केलं गं बयामराठ्यांना... मराठ्यांना फसवलं गं बया,दोन महिन्यांची, चार वर्षं झाली गं बया,आरक्षण कोर्टात अडकलं गं बया...’अशा एक ना अनेक एक सुरेल आणि आक्रमक कवनांतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शाहिरांचा डफ मंगळवारी दसरा चौकामध्ये कडाडला.आजवर अनेक लढ्यांमध्ये शाहिरांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे ...

कोल्हापूर : ‘या सरकारनं बरं नाही केलं गं बयामराठ्यांना... मराठ्यांना फसवलं गं बया,दोन महिन्यांची, चार वर्षं झाली गं बया,आरक्षण कोर्टात अडकलं गं बया...’अशा एक ना अनेक एक सुरेल आणि आक्रमक कवनांतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शाहिरांचा डफ मंगळवारी दसरा चौकामध्ये कडाडला.आजवर अनेक लढ्यांमध्ये शाहिरांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्या लढ्यांना मोठी ताकद मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहिरांची भूमिका निर्णयक ठरली. त्याच शाहिरांनी मंगळवारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उडी घेतली. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने हजारो मराठा बांधवांसमोर शाहिरांचा सरकारविरोधी डफ कडाडला. यामध्ये ‘जगायचं हाय काय मरायचं हाय,’ ‘आता काय मागं सरायचं नाय,’ ‘या सरकारला आता घेरायचं हाय’ अशी कवने सादर केली. तर ‘अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे,’ अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी शाहीर दिलीप सावंत, रंगराव पाटील, शहाजी माळी यांनी कवने सादर केली.दिवसभरात विविध गावच्या ग्रामस्थांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देत दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलनाच्या चौदाव्या दिवशीही आंदोलनाची धार वाढल्याचे दिसून आले. गावागावांतून युवक भगव्या टोप्या परिधान करून, भगवे झेंडे फडकावीत दुचाकी रॅली, पायी चालत दसरा चौक येथे येत होते. त्याचबरोबर क्रांतिदिनी पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.