शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
3
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
4
सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
6
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
7
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
8
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
9
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
10
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
11
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
12
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
13
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
14
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
15
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
16
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
17
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
18
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
19
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
20
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

वडार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर डंपर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गौण खनिज परवाना त्वरित द्यावा, ऑनलाईन रॉयल्टी चलन स्वीकारण्यात यावेत, गौणखनिजावरील दंड आकारणी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गौण खनिज परवाना त्वरित द्यावा, ऑनलाईन रॉयल्टी चलन स्वीकारण्यात यावेत, गौणखनिजावरील दंड आकारणी व वाहनावरील दंडाची कारवाई स्थगित करावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या डंपरवर वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे सजीव दर्शन घडवत वस्तुस्थिती मांडण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

दगड खाण मालक, स्टोन क्रशर मालक, डंपर मालक व कामगार कुटुंबीयांना वेठीला धरणाऱ्या शासनाच्या गौेण खनिज संबंधित धोरणाविरुद्ध गाढव-डंपर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, गाढवांना यात समावेश न करता डंपर मोर्चाचा निर्णय झाला. यात दोनशेहून अधिक डंपर सहभागी करण्यात आले. त्यापैकी वीस डंपरना शहरात प्रवेश दिला. उर्वरित डंपर बाजार समितीजवळ पोलिसांनी थांबविले. मोर्चात प्रतिकात्मकरीत्या एक (ट्रेलर) डंपर मोर्चात सहभागी करण्यात आला. यावर सजीव चित्ररथ साकारण्यात आले. टोप येथून निघालेला हा मोर्चा दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी समाजातील प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात गौण खनिज परवान्याची मुदत एक वर्षासाठी ठेवावी, मौजे टोप येथील गायरान पडीक जमिनीमधील बेघर वडार समाज व कामगार यांची घरे कायम करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, लीज खाणपट्टा करताना नगररचना कार्यालयाची नाहरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, समाजास शासकीय जमिनीत उत्खननास परवानगी मिळावी, अशा जमिनी समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी राखीव ठेवाव्यात. संबंधित दोषी गौण खनिज यंत्रणेतील अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मोहन पाटील, हणमंत पाटील, रंगराव भोसले, रमेश पोवार, संभाजी पोवार, अविनाश कलकुटगी, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

फोटो नं ०१०२२०२१-कोल-वडार समाज मोर्चा

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या डंपरवर समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे सजीव दर्शन घडवत वस्तुस्थिती मांडण्यात आली. (आदित्य वेल्हाळ)

---