सांगली : माजी मंत्री, दिवंगत कॉँग्रेस नेते मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत पिळदार स्नायू आणि आकर्षक पोझरच्या जोरावर कोल्हापूरचा राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू दुर्गाप्रसाद दासरी याने विजेतपद पटकावले. सांगलीच्या प्रवीण निकमला मोस्ट इम्प्रूव्हडचा, तर पुण्याच्या राजेश इरले याला बेस्ट पोझरचा किताब मिळाला. पाच वजनी गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. ६० किलो वजनी गटात पुण्याच्या संतोष थोरात, नितीन दाखले आणि मोईन सुफी यांनी, ६० ते ६५ किलो गटात पुण्याचे अतुल साळुंखे, तुषार चोरगे, सांगलीचा रोहित म्हेत्रे यांनी, ६५ ते ७० किलो गटात पंढरपूरचा किसन पालसांडे, सांगलीचा किरण शिंदे, पुण्याचा महेशकुमार यांनी, तर ७० ते ७५ किलो गटात पुण्याचा रूपेश चव्हाण, कोल्हापूरचा योगेश पवार, पुण्याचा महेश मोझे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. खुल्या गटात कोल्हापूरचा अजिंक्य रेडकर व पुण्याचा विनीत शिंदे यांना द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला. सांगली व पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांतील ९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कॉँंग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील व महापौर हारुण शिकलगार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दुर्गाप्रसाद ‘मदनभाऊ श्री’चा मानकरी
By admin | Published: March 07, 2016 1:13 AM