कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दुर्गाप्रसाद दासरी याने गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे घेण्यात आलेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान पटकावला. त्याला ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ बहुमानाने गौरविण्यात आले. नुकतीच पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने गडमुडशिंगी येथील श्रीकांत फिटनेस सेंटरच्यावतीने खुल्या रंगमंचावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गाव मर्यादित स्पर्धेचा बहुमान गडमुडशिंगीच्या सागर गोसावी याने पटकावला तर ‘मोस्ट इम्प्रुव्हड’ म्हणून सांगलीच्या विजय कुंभार व ‘बेस्ट म्युझिक पोझर’चा बहुमान ‘शाहू साखर’च्या योगीराज शिंगे याने मिळवला. सांघिक विजेतेपदाचा बहुमान कोल्हापूर संघाने, तर उपसांघिक विजेतेपदाचा बहुमान सांगली संघाने पटकावला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सरपंच तानाजी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच अशोक दांगट, संयोजक राकेश कुराळे, सचिन पाटील, विनोद सोनुले, दिलीप बागणे, निवास माळी, गोपाळराव कांबळे, शिवाजी गिरूले, संदीप पोवार, सुशांत माळी, राहुल गिरूले, आदी उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल गडमुडशिंगी मर्यादित : सागर गोसावी, संतोष कवने, रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभागीय खुला गट : (६० किलो ) : विजय कुंभार (सांगली), मोहमद बेपारी (मिरज), बापूसाहेब अष्टेकर (शाहू साखर), ६५ किलोगट : स्वप्निल आजगेकर, संग्राम जाधव (दोघेही कोल्हापूर), वैभव गवळी (सातारा), ७० किलोगट : योगेश पवार (वारणानगर), अक्षय दांडेकर (कोल्हापूर), रफिक जमादार (रेंदाळ), महमद आलूरकर (कोल्हापूर), ७५ किलोगट : योगीराज शिंगे (शाहू साखर), रियाज पठाण (मिरज), विनायक रेडेकर, ७५ किलोवरील गट : दुर्गाप्रसाद दासरी (गडमुडशिंगी ), विशाल कांबळे (मिरज), संग्राम सावंत (गारगोटी)
दुर्गाप्रसाद ठरला ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’
By admin | Published: January 02, 2015 10:48 PM