शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुर्गजोडी दुर्लक्षितच--साद गड किल्ल्यांची

By admin | Published: December 26, 2014 10:02 PM

किल्ले चंदन-वंदन

प्रशांत पिसाळ - पळशी--लोणावळ्याजवळील लोहगड-विसापूर या जोड किल्ल्यांप्रमाणेच कोरेगाव, वाई, सातारा या तालुक्यांच्या सीमेवर ‘चंदन-वंदन’ ही अनोखी दुर्गजोडी आहे. अनोख्या या दुर्गजोडी सध्या शेवटची घटका मोजत आहेत.‘चंदन’ हा किल्ला कोरेगाव तालुक्यातील बनवडी हद्दीत तर ‘वंदन’ वाई तालुक्याच्या खोलवडीच्या हद्दीत येतो. हे किल्ले गिरीदुर्ग या प्रकारात मोडतात. या किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून १,१७१ मीटर आहे. भाडळी-कुंडल रांगेचा फाटा यापर्यंत रांगेमध्ये या गडांचा समावेश होतो. या किल्ल्यांची उभारणी विजापूरच्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याने इ.स. १६०० मध्ये केली. त्यानंतर इ. स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आण्णाजी दत्तो सुबनवीस यांच्या मदतीने स्वारी करून चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून घेतले. नंतर ६ आॅक्टोबर १७०१ रोजी हे किल्ले औरंगाजेबाने जिंकले. पुन्हा तो छत्रपती संभाजीनंतर ताराबाई परत १७०८ मध्ये हा शाहूंच्या ताब्यात आला. सन १७९० च्या महसूलविषयक नोंदीमध्ये ‘चंदन-वंदन’ किल्ल्याची विजापूर सुब्यातील परगना (मुख्यालय) अशी नोंद आहे. तेथील महसूल २१,६४४ रुपये होता. इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे सहज गेला. आदिलशहा राज्यातील एक महत्त्वाचा परगाना हा किल्ला होता. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा; पण शासनाकडून पूर्ण दुर्लक्षित झालेला हा किल्ला व त्यावरील ऐतिहासिक वास्तू हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यावर गेल्यावर पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे प्रवेशद्वार पाहावयास मिळते. सध्या फक्त एकच बाजू शिला असल्याने येथे प्रवेशद्वार होते, हे समजते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेतल्यावर येथे चंदनेश्वराचे छोटे मंदिर बांधले. मुस्लीम शाहीच्या जास्तीत जास्त वेळ ताब्यात असलेल्या किल्ल्यावरील कोणत्याही मशिदीची व कबरीची मोडतोड महाराजांनी न करता त्या वास्तू तशाच ठेवल्या. आजही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर असलेला हजरत पीर दर्गावर आजही हजारो हिंदू-मुस्लीम लोक भक्तीने येतात. येथे उरूसही साजरा करतात. मौल्यवान खजिना नामशेषाच्या मार्गावरदगडी स्तंभ : प्रवेशद्वारावर पुढे गले की, एकावर एक रचलेले प्रचंड दगडीस्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. याच्या समोरच दर्गाची इमारत आहे.पार : सुंदर नक्षीदार दगडावर एक मोठा व्यासपीठ वजा पार आढळतो. या पारावर बसून न्यायदान व तक्रारनिवारण करण्याचे काम पार पाडले जात होते.कोठार : धान्य साठवणुकीसाठी दगडी बांधकाम करून कोठार केले होते. परंतु,ते सध्या ते पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.दर्गाच्या मागे एक विहीर आहे. ती जास्त खोल नसून त्या विहिरीस चांगले पाणी आहे.