शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 12:45 PM

महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार

इचलकरंजी : राज्यातील आघाडी सरकार हे स्थगिती देणारे सरकार होते, तर आता गतिमान सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळात एकही मोर्चा निघाला नाही. तसेच कोणी आत्महत्या करण्याचा इशारा दिला नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरच ते कसे घडते? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून नावलौकिक मिळवावा तसेच केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.येथील भाजप कार्यालय नूतनीकरण उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याची माहिती जनतेला नाही. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कोरोनामुळे अनेक देश डबघाईला आले असताना भारत देशाने अकराव्या स्थानावरून पाचवे स्थान प्राप्त केले. खासदार माने म्हणाले, भाजप हे शिस्तीचे विद्यापीठ आहे, तर शिवसेना मुक्त विद्यापीठ आहे. शिस्तीला महत्त्वाचे स्थान आहे. पडत्या काळात पक्षासोबत जे राहिले, ते सच्चे कार्यकर्ते आहेत. सध्या राज्यात त्रिशंकू सरकार आहे. ते तिप्पट वेगाने आणि गतीने पुढे जात आहे.हाळवणकर म्हणाले, शहरात चांगली बूथरचना भाजपने उभी केली आहे. हे कार्यालय सेवेचे मंदिर बनणार आहे. सुरुवातीला शाहू पुतळा ते भाजप कार्यालय अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महाडिक यांनी कार्यालयाचे उद्घाटन आणि भारत मातेच्या प्रतिमेचे अनावरण केले. शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी स्वागत केले. कार्यक्रमास राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहाजी भोसले, अशोक स्वामी, अलका स्वामी, मिश्रीलाल जाजू, भाऊसाहेब आवळे, रिषभ जैन, ॲड. भरत जोशी, दीपक पाटील, अमृत भोसले यांच्यासह माजी नगरसेवक, बूथप्रमुख, शक्तीप्रमुख उपस्थित होते.

भाजप-शिवसेनेचा महापौरमहापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिले नगरसेवक होण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीचा पहिला महापौर इचलकरंजी महापालिकेत होईल, असा विश्वास हाळवणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक