शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दाट धुक्यात शहर गुडूप; वाहतूक ठप्प

By admin | Published: February 13, 2016 12:38 AM

जनजीवनावर परिणाम : किरकोळ अपघात; सकाळी साडेदहापर्यंत धुके; रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांची शुक्रवारची पहाट उजाडली ती दाट धुक्याची चादर बाजूला सारतच. एरव्ही साधारणपणे आठच्या सुमारास गडप होणाऱ्या धुक्याने शुक्रवारी मात्र साधारणपणे साडेदहापर्यंत शहर गुडूप केले होते. विशेषत: पंचगंगा नदी काठच्या पट्ट्यात धुक्याची तीव्रता अधिक असल्याने एक फूट अंतरावरीलही दिसत नव्हते त्यामुळे वाहनधारक हेडलाईट लावूनच प्रवास करत होते. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूकही धिम्यागतीने सुरु होती.गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यातील वातावरण चांगले राहिले आहे. मागील वर्षी प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ऋतुमानच बदलल्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला होता. यंदा पाऊस कमी पडला असला तरी आॅक्टोबरनंतर हवामान स्वच्छ राहिले आहे. थंडी कमी राहिली असली तरी त्यात सातत्य राहिल्याने पिकांना पोषक ठरले. चांगल्या वातावरणामुळे फळे, भाजीपाला जोमात आहेत पण गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. ढगाळ हवामानाबरोबरच गार वारे वाहत असल्याने दिवसभर अंगातून थंडी जात नाही. शुक्रवारी पहाटेपासून दाट धुके व अंगाला बोचणारे वारे वाहत होते. धुके इतके दाट होते अक्षरश: पांघरुण घातल्यासारखे वातावरण होते. सकाळी दहावाजेपर्यंत हे दाट धुके होते. दहानंतर हळूहळू सूर्यनारायणाचे दर्शन झाले, तरीही दिवसभर हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली असून कमाल २९ डिग्री तर किमान १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. आगामी दोन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्यावर परिणाम झालाच पण त्याबरोबर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचा भरणा सध्या दवाखान्यांत दिसत आहे. कारची टोल नाक्यास धडककसबा बावडा : पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा... चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा...असे वातावरण कसबा बावडा आणि परिसरातील लोकांनी अनुभवले. पहाटे फिरावयास जाणाऱ्यांनी हातातील टॉर्चच्या उजेडात ‘मॉर्निंग वॉक’ पूर्ण केला. सकाळी दहा वाजेपर्यंत धुके कायम होते. दरम्यान, धुक्यात रस्ता न दिसल्यामुळे एका मारुती स्वीप्ट डिझायर गाडीने शिये टोल नाक्याला जोराची धकड दिली. त्यात चालक किरकोळ जखमी झाला. धुक्यामुळे पहाटेच्यावेळी राजाराम साखर कारखान्याकडे जाणारे ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने अगदी संथ गतीने जात होती. तर इतर वाहने हळूहळू हॉर्न वाजवत पुढे सरकत होती. या धुक्यात गारव्याची लाट पसरल्याने फिरावयास जाणाऱ्यांनी स्वेटर, कानटोपी, मफलरचा आधार घेतला. कोल्हापुरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये :वारकिमानकमाल शुक्रवार१५२९ शनिवार१६३१ रविवार१७३१ सोमवार१८३३