शिरोळ : जादा पाणी आणि रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक झाल्या. अशा जमिनी सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळेच नापीक जमिनी पिकाखाली येत आहेत. क्षारपडमुक्तीसाठी दत्त उद्योग समूहाने सुरू केलेले काम आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
येथील ग्रामदैवत बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा व कृषीपूरक उद्योग सहकारी संस्थेच्या वतीने शिरोळमधील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या क्षारपड जमीन प्रकल्पाच्या सर्व्हेचा प्रारंभ जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. पहिल्या टप्प्यात ९०० एकरपैकी ४५० एकर जमीन क्षारपडमुक्त करण्यात येणार आहे. स्वागत व प्रास्ताविक करून नगरसेवक तातोबा पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या प्रयत्नाची प्रत्यक्षात सुरुवात झाली असल्याचे सांगितले.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, अनिलराव यादव, भाऊसाहेब खोंद्रे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड, दत्तचे कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, श्रीशैल्य हेगाण्णा, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोकराव माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, बाबासाहेब पाटील, संजय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
..तर शासनाकडे प्रस्ताव
जिल्ह्यातील नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी शासनाच्या महात्मा फुले रोजगार हमी योजनेत जमीन सुधारणा कामाचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिली.
फोटो - २१०१२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
शिरोळ येथे क्षारपड जमीन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गणपतराव पाटील, रावसाहेब देसाई, डॉ. अशोकराव माने, अनिल यादव, तातोबा पाटील यांच्यासह मान्यवर.