राजकारण म्हटले की, चढ-उतार असतो; पण साहेबांच्या कारकीर्दीचा आलेख हा चढताच राहिला आहे. दिलेला शब्द पाळायचा. विश्वासार्हता राखणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अडचण आली की कोणीही सकाळी उठावे आणि साहेबांच्या दरबारात गाऱ्हाणे मांडावे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून साहेबांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. वृद्ध, अपंगांची पेन्शन मंजूर करून मोठे पुण्य कर्म होत आहे. एमआयडीसीमध्ये अनेक तरुणांच्या हाताला काम देत बेरोजगारी कमी केली. एखाद्याचे दु:ख ऐकलं की साहेब क्षणात हळवे होतात. त्यांचे हे हळवे मन संवेदनशीलतेने भरलेले आहे.
सहकार क्षेत्र अडचणीत असताना साहेबांनी केडीसीसीच्या माध्यमातून एक वेगळाच आदर्श घालून दिला. कर्तृत्वाचा हा वटवृक्ष भविष्यात खूप मोठी झेप घेणार याची मला खात्री आहे. त्यांच्या राजकीय भरारीसाठी आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा...!
प्रवीणसिंह भोसले
संचालक, बिद्री साखर कारखाना