शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

दुरवस्थेला अकार्यक्षम मंडळी जबाबदार

By admin | Published: April 18, 2016 12:09 AM

मेघराज राजेभोसले : कोल्हापूर, पुणे, मुंबईत २४ एप्रिलला मतदान

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मतदान दि. २४ एप्रिलला कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे होणार आहे. या निवडणुकीत एकूण नऊ पॅनेलसह १२० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ची भूमिका रविवारी सर्व सभासदांपुढे मांडली आहे. याबाबत स्वत: मेघराज राजेभोसले यांच्याशी साधलेला संवाद प्रश्न : महामंडळाचे इतके सभासद असूनही केवळ ३९०४ जणांनाच मतदानाचा अधिकार का ?उत्तर : महामंडळामध्ये जवळजवळ २६ हजार सभासद आहेत. त्यापैकी केवळ ‘अ’ वर्ग ज्यांना मतदानाचा अधिकार आहेत, ते केवळ ३९०४ जणच आहेत. कारण विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे यांना जादा सभासद मतदानाकरीता पात्र झाले तर आपल्या खुर्चीला धक्का लागेल असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मर्जीतीलच काही सभासदांना ‘अ’ वर्गात घेतले. प्रश्न : महामंडळाची कशी व कोणती दुरावस्था झाली आहे ? उत्तर : कोणत्याही विश्वस्त संस्थेत अध्यक्ष, सभासद जेव्हा मालक झाल्यासारखे वागू लागतात, तेव्हा त्या संस्थेचे मातेरे होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळही दुदैवाने याला अपवाद ठरले नाही. मोठ-मोठी उड्डाणे घेणाऱ्या या संस्थेच्या मागच्या पंचवार्षिक कालावधीत अध्यक्षांनी स्वत: ची तुंबडी भरली. पाच वर्षांत तीन अध्यक्ष आणि प्रत्येकाची तऱ्हा तीच, याची खाबुगिरी इतक्या टोकाला गेली की, अध्यक्षाला सभा अर्धवट सोडून रिक्षातून पळ काढावा लागला. कार्यक्रमासाठी चित्रपट महामंडळाच्या ठेवी मोडणे आणि त्यातून अर्थिक गैरव्यवहार करणे असे प्रकार उघड होऊनही संबंधितांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.प्रश्न : तुमच्या पॅनेलमधून कोणाला स्थान दिले आहे ?उत्तर : सतीश रणदिवे, पितांबर काळे, अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, धनाजी यमकर, निकीता मोघे, अमर मोरे, मधुकर देशपांडे, विजय खोचीकर, संजय ठुबे, शरद चव्हाण, चैत्राली डोंगरे, रणजित ऊर्फ बाळा जाधव यांना स्थान दिले आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून ही मंडळी महामंडळाला उच्च स्थानावर नक्कीच नेतील. यासह कोल्हापुरातही चित्रनगरीच्या रूपाने लवकरच चित्रीकरणास सुरुवातही आम्हाला संधी दिल्यास सुरू करून हाताला काम नसलेल्या कामगारांना काम दिले जाईल. मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक --माझी भूमिका