ठळक मुद्देमहापालिकेच्या सर्व शाळांत ई लर्निंग सुविधाअंदाजपत्रकात व्यक्त केला निर्धार
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी सभापती अशोक जाधव, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी स्थायी समितीत सादर केले. सर्व शाळेतून ई लर्निंगची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्धार अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.शिक्षण समितीने सन २०१९-२० सालाचे एकूण रक्कम ४८ कोटी ८४ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले असून, यामध्ये महापालिका फंडातून रुपये ३१ कोटी २९ लाख इतकी अनुदान मागणी केली आहे. अंदाजपत्रक सादर करतेवेळी उपसभापती सचिन पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.वैशिष्ट्ये
- सेमी इंग्रजी शाळा-सध्या १४ प्राथमिक शाळांत सेमी इंग्रजी सुरू असून, नवीन पाच ते सहा सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा मानस.'
- मॉडेल स्कूल : पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची निकड भासत आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देणे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे; त्यासाठी ज्ञानरचनावाद
- डिजिटल वर्गाची निर्मिती या गोष्टी प्रामुख्याने आवश्यक आहेत; त्यामुळे निवडक १० शाळा मॉडेल स्कूल बनविण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करण्यात आलेला असून, अंदाजपत्रकामध्ये ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- शैक्षणिक सुविधा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, फर्निचर साहित्य, शैक्षणिक तक्ते, सायन्स साहित्य, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.
- ई लर्निंग सुविधा : सध्या २७ शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा असून,उर्वरित सर्व महापालिका शाळांना सी. एस. आर. फंडातून ई लर्निंग सुविधा (प्रोजेक्टर) पुरविण्यात येणार आहे.
- बाल वाद्यवृंद : शाळांतील विद्यार्थ्यांचे बाल वाद्यवृंद सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तयार करण्याचा मानस आहे.