शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कोल्हापूर पूर्वपदाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:59 AM

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट ...

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट पाणी असल्याने तो रविवारीही बंद राहीला. आज, सोमवारी पाणी पातळी कमी झाल्यावर महामार्ग सुरू होण्याची शक्यता असून, इंधनाची वाहने प्राधान्याने सोडली जाणार आहेत. शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर व कर्नाटकची हवाई पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. ‘गोकुळ’ दूध संघाने कोकणमार्गे मुंबईकडे दोन लाख लिटर दूध रवाना केले. आजअखेर पुरामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील पूर ओसरू लागला असून, शहरासह आसपासच्या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील गवत मंडई येथील पाणी ओसरल्याने येथून वाहतूक सुरू झाली. पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम गतीमान करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुदरगड, गडहिंग्लज, कागल येथील काही मार्ग पाणी ओसरल्यामुळे सुरू झाले. गेले सहा दिवस महामार्ग बंद असल्याने ‘गोकुळ’चे टॅँकर मुंबईकडे गेले नसल्याने नुकसान झाले होते; त्यामुळे कोकणमार्गे रविवारी दोन लाख लिटर दूध टॅँकरद्वारे मुंबईला पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील व कर्नाटकातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमानाद्वारे हवाई पाहणी करून आढावा घेतला. शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. या ठिकाणी मदतकार्य गतीने वाढविण्यात आले असून, बोटींची संख्याही वाढविण्यात आली आहे. सकाळी २५ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले असून, ते शिरोळकडे पाठविण्यात आले. शिरोली येथे अजूनही तीन फूट पाणी असल्याने महामार्ग बंद राहिला; परंतु आपत्ती व्यवस्थापनात असलेल्या विमानांसह वाहनांसाठी इंधनाची तातडीची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दिवसभरात तीनवेळा पाहणी केली. यावेळी चाचणीद्वारे पोकलॅनच्या सहाय्याने इंधनाचे पाच टॅँकर व सिलिंडरचे एक वाहन शिरोलीतून कोल्हापुरात आणण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाईशहरात जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून, त्यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्ग बंद असल्याने टंचाई दूर करण्यात अपयश येत आहे. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, पिण्याचे पाणी याची मोठी टंचाई आहे. गॅस, भाजीपाला, पिण्याचे पाणी, वीज नाही; त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा, असा प्रश्न पडलेल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसायच बंद ठेवले.प्रशासनाचा कारभार ‘ढिम्म’च: उल्हास पाटीलकोयना धरण ८0 टक्के भरल्यानंतर ३१ जुलैला शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका असल्याचा इशारा मी जिल्हाधिकारी यांना भेटून दिला होता. तसे लेखी पत्रही दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप आमदार उल्हास पाटील यांनी रविवारी केला. -