कोल्हापूर : उन्हाळ््याची चाहूल देणारा होळी सण आज, गुरुवारी सर्वत्र साजरा होत आहे...पण होळीच्या आदल्या दिवशीच बच्चेकंपनीने टिमकी आणि ताशांचा कडकडाट सुरू केल्याने उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टिमकी, ताशांची विक्री केली जात आहे. निसर्गप्रेमी संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रतीकात्मक होळी साजरी करत होळी लहान आणि पोळी दान करण्याचे आवाहन केले आहे. वाईट गोष्टींचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणाऱ्या होळीला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. गेल्या काही वर्षांत होळीच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी व निसर्गप्रेमी संस्थांनी नागरिकांना प्रतीकात्मक होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील तरुण मंडळांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान करण्याचा उपक्रम राबवला जातो. यंदा श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या विद्यमाने होळीनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला ६१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत. अंबाबाई मंदिराबाहेरील संत गाडगे महाराज चौकात सकाळी ११ वाजता या शेणी महापालिके च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येतील. शिवाजी पेठेतील वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळाच्यावतीने दुपारी साडेबारा वाजता पंचगंगा स्मशानभूमीस ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)स्वाईन फ्ल्यूशी लढा सध्या सगळीकडे स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्ल्यूचे विषाणू धूप किंवा धूर असलेल्या ठिकाणी जगत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने होळीत किमान पाच कापूर टाकावेत त्यामुळे वातावरण शुद्ध होऊन स्वाईन फ्ल्यूूला आळा घालण्यास मोलाची मदत मिळेल, असे आवाहनही व्हॉटस् अॅपवर केले जात आहे.होळीच्या आकारावर कुणाचाही प्रतिष्ठा ठरत नसते, पण मोठ्या होळीने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अगदी एका शेणीतसुद्धा प्रतीकात्मक होळी साजरी करता येते. होळीत लाकूड, टायर किंवा प्लास्टिकसारख्या वस्तू जाळू नका, त्यामुळे प्रदूषण वाढते. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ
पर्यावरणपूरक होळी करणार
By admin | Published: March 04, 2015 11:35 PM