प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घराला पर्यावरणपूरक बनविणे ही खर्चिक गोष्ट आहे, अशी कारणे देत अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, काही सोप्या आणि सरळ गोष्टींचा वापर करून घर नव्हे तर प्रतिभानगर रोड येथील रहिवाशांनी ‘लाईफ स्टाईल’ ही अख्खी अपार्टमेंटच इको-फ्रेंडली केली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मूलभूत गरजाही वाढत जातात. त्याचा ताण शासकीय व्यवस्थेवर येतो. शासकीय यंत्रणेला दोष न देता लाईफ स्टाईल अपार्टमेंटमधील रहिवाशांनी यामधून स्वत:चा मार्ग काढून कचरा व्यवस्थापन व सौरऊर्जा प्रकल्प राबवून एक आदर्श अशी अपार्टमेंट म्हणून ओळख निर्माण केली आहे.रहिवाशांनी आपल्या घरातील कचरा कोंडाळ्यात न टाकता कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमास अनेकांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार त्यांनी अपार्टमेंटजवळच ओला व सुका कचरा स्वतंत्र करण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक वारानुसार ओला कचरा जमा केला जातो. त्याद्वारे कचरा व्यवस्थापन करून खतांची निर्मिती केली आहे.त्यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. मासिक देखभालीपोटी गोळा केलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम केवळ वीज बिलावर खर्च होत होती. मात्र सौरऊर्जेचा वापर करून, वीज बिलात कपात केली आहे. या प्रकल्पातील सौरऊर्र्जेचा वापर येथील लिफ्ट, बागेसाठी पाणी, टाकीत पाणी, परिसरातील लाईटचा वापर यासाठी केला जातो. सौरऊर्जेच्या यंत्रणेद्वारे चोवीस तास गरम पाण्याचे नियोजन या ठिकाणी केले आहे.अपार्टमेंटमध्ये ७० कुटुंबीय राहतात. सर्वांना वाढदिवस, घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टिकचे ग्लास, चमचे, प्लेट, आदींचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीनेच येथील कार्यक्रम होतात.सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाटसॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात न टाकता, अपार्टमेंटखाली सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसविले आहे. याद्वारे या नॅपकिनची विल्हेवाट लावली जाते.
पर्यावरणपूरक राहणीमानाची ‘लाईफ स्टाईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:35 AM