शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 5:15 PM

आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचलावझरे, खोतवाडी, पेरणोलीसह भुदरगड सिमाभागाला धोका

आजरा :आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.भुदरगड व आजरा तालुक्याच्या सीमेलगत २५ ते ३० किलोमीटर लांबीचा व १ हजार फूट उंचीच्या जंगलाने व्यापलेला हा कडा आहे. कड्यावरच्या कांही अंतरावर मैदानी पठार आहे तर कांही भाग घनदाट झाडांनी व्यापला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या कड्याच्या इतिहासात कड्याला प्रथमच धोका निर्माण झाला आहे.१९८३ नंतर प्रथमच दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडीजवळील १ हजार फूट उंच असलेल्या कड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पहिल्यांदाच या भेगा नागरिकांना दिसल्याने दोन्ही तालुक्यातील कड्याच्या क्षेत्रातील गावामध्ये भिती पसरली आहे.कड्याला आडव्या भेगा पडल्या आहेत. भेगा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पडून कडा खचल्याने खोतवाडी, वझरे व नावलकरवाडी या वस्त्यांना प्राथमिक स्तरावर धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून ग्रामस्थामध्ये घालमेल सुरू आहे. खोतवाडी येथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हा कडा आहे. कड्याच्या कांही अंतरावरच खोतवाडी, नालकरवाडी या वस्त्यासह वझरे गाव वसलेले आहे. कड्यावर मोठे दगड व झाडे आहेत.भेगा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने दगड, झाडे कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतात अशी परिस्थितीत तयार झाली झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.या गावांना आहे धोकाआजरा तालुक्यातील खोतवाडी, वझरे, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, हरपवडेपैकी धनगरवाडा तर भुदरगड तालुक्यातील मेघोली, मेघोलीपैकी धनगरवाडा, तळकरवाडी या वस्त्या व गावांना धोका पोहचू शकतो.----------------------------* प्रशासनाकडून दक्षतेची गरजतालुक्यात व जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष गेलेल नाही. दोन्ही तालुक्यातील सीमाभागातील गावांना सतर्कतेसाठी प्रशासनाने दक्ष राहून सतर्कतेचा आदेश देण्याची गरज आहे.----------------------------फोटो ओळी : आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी येथील शिवबाची राई’ या कठड्या अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कठ्यावरील माती व वृक्ष उन्मळून पडत असल्याने या परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.क्रमांक : १२०८२०१९-गड-०१/०२

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर