कागल : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’ विविध उपक्रम राबवित आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांना ‘संस्कारांचे मोती’ देण्याचे काम केले आहे. ‘लोकमत’ची ही शैक्षणिक चळवळच आहे, असे गौरवोद्गार येथील पंचशील शिक्षण संस्थेचे सचिव अबीद मुश्रीफ यांनी काढले.कागल येथील होलिडेन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या शैक्षणिक उपक्रमाचा लकी ड्रॉ विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत काढण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वितरण व्यवस्थापक संजय पाटील, संस्थेचे मुजाहित कोल्हापुरे, स्कूलच्या मुख्याध्यापिका नेहा जोशी, शीतल देसाई, ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी जहॉँगीर शेख, वितरण विभागाचे विश्वजित पाटील, धनाजी पाटील, शिराज भोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.वितरण विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक भारत माने यांनी या स्पर्धेबद्दल माहिती दिली, तर आपल्या प्रमुख भाषणात संजय पाटील म्हणाले की, विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचे भावी नागरिक आणि समाजाचे आधार असतात. हे भावी नागरिक वैचारिक दृष्टिकोनातून समृद्ध व्हावेत, यासाठी ‘लोकमत’ने ‘संस्कारांचे मोती’ असे शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्याला संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. होलिडेन इंग्लिश स्कूलचे कामकाज पाहून समाधान वाटते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या हजारो प्रवेशिका तालुकानिहाय टेबलावर ठेवून मान्यवरांच्या हस्ते, तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते बक्षिसे काढण्यात आली. राजेश पाटील, उदय पाटील, सोमन कांडेकरी आदी उपस्थित होते. शशिकांत गुडीमनी यांनी स्वागत केले. तर पराग कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘संस्कारांचे मोती’ ही शैक्षणिक चळवळ
By admin | Published: March 14, 2017 9:36 PM