शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मैत्रीपूर्ण निवडणुकीचा प्रभावी ‘आणूर पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:13 AM

म्हाकवे : कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. ...

म्हाकवे :

कागल तालुक्यात सध्या ५३ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावात टोकाची ईर्षा, हाडवैर पाहायला मिळत आहे. मात्र, इतर गावांप्रमाणेच ईर्षेने आणि अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील समजूतदारपणाही वाखणण्यायोग्य आहे.येथील मतदान संपले की, उमेदवारांसह नेतेमंडळी हातात हात घालून मतदान केंद्रावरून घरी परतात. या गावाचा मैत्रीपूर्ण निवडणूक पॅटर्न अनेक वर्षांपासून परिसरात चर्चेचा विषय असला तरी, अनुकरण मात्र होताना दिसत नाही.

वेदगंगा नदीच्या उत्तर तिरावर वसलेले हे गाव शाश्वत पाण्यामुळे शेतीच्या आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनले आहे. येथे मंडलिक, मुश्रिफ, संजय घाटगे, राजे यांसह संभाजी ब्रिगेड, लाल बावटा पक्षांचे अस्तित्व आहे. सर्वच निवडणुकांसह येथील ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या निवडणुकाही अटीतटीने होतात. मात्र,निवडणुकीचा फाॅर्म भरल्यापासून मतदान होईपर्यंतच ईर्षा असते. मतदान संपताच सायंकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावरून बाहेर पडताना मैत्रीपूर्ण चर्चा करत सर्वजण बाहेर पडत असतात.

विशेष म्हणजे आजतागायत कोणताही राजकीय वाद-विवाद झालेला नाही.तसेच येथेही भावकीतच परस्परविरोधी उमेदवारी दिली जाते. परंतु, हा वाद उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरगुती कार्यक्रमाला पुन्हा एकसंध होतात. त्यामुळे येथील मैत्रीपूर्ण राजकीय निवडणुकीचा पॅटर्न इतर गावांनीही अवलंबल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल.

दूरदृष्टी असणारे नेतृत्व...

मारुतीराव सावडकर यांनी १९८० मध्ये नदीत उभारलेले जॅकवेल आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळते. तसेच गावाच्या उत्तरेला स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रस्त्याची (बायपास) गरज लक्षात घेऊन तो केला. त्यामुळे त्यांना एकदा सत्ता गमवावी लागली. मात्र, सर्वांची सोय झाली. तसेच शिवाजीराव चौगुले यांनी केलेल्या पाणी योजनेमुळे शेतीचे नंदनवन झाले आहे.