यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी रेशीम शेती, शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन, बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे. गटशेती, आत्मा, एनएचएम योजना वाढविण्यावर भर देण्यात यावा. शेतीक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग व शेतकऱ्यांमध्ये संवाद वाढविण्यासाठी सूचना केल्या. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, गट शेती योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्यपत्रिका कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना अशा अनेक योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी योग्य कार्यक्रम आखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
यावेळी तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले, मंडळ अधिकारी ओंकार कराळे, बी. पी. पाटील, विठ्ठल चव्हाण, पी. आय. पाटील, रमेश पाटील, बाजीराव चव्हाण यांच्यासह कृषी सहाय्यक, कृषी सेवक उपस्थित होते.
फोटो : कृषि विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत बाजीराव चव्हाण, कृषी अधिकारी नितीन भांडवले आदी.