एस.टी.कर्मचाऱ्यांना कोवीड लस देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 02:29 PM2021-03-29T14:29:33+5:302021-03-29T14:31:28+5:30
congress St Kolhapur-सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना सरसकट कोवीड ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
कोल्हापूर : सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना सरसकट कोवीड ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
एस.टी.च्या वाहक,चालकांनी लॉकडाऊन काळात परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे.कर्मचारी मंडळी रोज हजारो प्रवाशांशी थेट संर्पकात असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोवीड लस देणे गरजेचे आहे. याकरीता स्वत: पालकमंत्री म्हणून लक्ष घालावे. असे या निवेदनात म्हटले होते. यावर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभागाचे संचालक यांच्याशी फोनवरून बोलून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहून तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती करण्याचेही त्यांनी उपस्थित कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासित केले. यावेळी संघटनेच्या विभागीय अध्यक्षा अनिता पाटील, सचिव संजीव चिकुर्डेकर, विजय भोसले, बी.आर.साळोखे, एस.वाय.पवार, बी.डी.शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.