कोेल्हापूर : विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकषांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. गुरुवारीही हा बहिष्कार कायम राहिला. त्याचा परिणाम होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
या बहिष्कारामध्ये जिल्ह्यातील सुमारे ५५४ तलाठी सहभागी झाले आहेत. हा बहिष्कारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दाखले वितरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
आवश्यकता असतानाही दाखले मिळत नसल्याने संतप्त भावनाही नागरिकांमधून उमटत आहेत; परंतु आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा तलाठ्यांनी घेतला आहे. दाखल्यांपुरता बहिष्कार मर्यादित असला तरी तलाठ्यांकडून महसूल यंत्रणेतील इतर कामकाज केले जात होते.