शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

दोन्ही उमेदवारांकडून एकगठ्ठा मतदान मिळविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:01 AM

अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकगठ्ठा मतदान असलेला इचलकरंजी मतदारसंघ आहे. याठिकाणी भाजप-शिवसेनेला ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकगठ्ठा मतदान असलेला इचलकरंजी मतदारसंघ आहे. याठिकाणी भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी म्हणून कॉँग्रेस व राष्टÑवादीसह महाआघाडीने खासदार राजू शेट्टी यांना पाठबळ देत त्यांच्या विजयासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. परिणामी, सुरुवातीला शहरात पूर्णत: शेट्टीविरोधी असणाऱ्या वातावरणात थोडा-फार फरक पडला आहे. तसेच धैर्यशील माने यांना सोप्या वाटणाऱ्या या मतदारसंघात त्यांनाही आमदार सुरेश हाळवणकर यांचे बोट धरून कंबर कसावी लागणार आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ९१ हजार ३२७ मतदार संख्या आहे. त्यातील ग्रामीण भागाच्या पाच गावांचे मिळून ७१ हजार मतदार आहेत. उर्वरित सुमारे दोन लाख २० हजार मतदार हे इचलकरंजी शहरातील आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील अन्य मतदारसंघाच्या तुलनेत गावे, वाडी-वस्त्या व शहरांच्या मानाने इचलकरंजी मतदारसंघात एकगठ्ठा मतदान आहे.या मतदारसंघात वारणा पाणी योजनेवरून राजकारण सुरू आहे. त्यामध्ये इचलकरंजी शहराला पाणी मिळण्यासाठी खासदार शेट्टी यांनी म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, असा मतप्रवाह बनला आहे. शेट्टी यांनी प्रयत्न करत सर्वांना एकत्रित करून सामंजस्य तोडगा काढावा, अशी लोकभावना होती. त्यावर शेट्टी यांनी प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये राजकारण करून हाळवणकर यांनीच निवडणुकीसाठी हा मुद्दा प्रलंबित ठेवला असल्याचा आरोपही कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याबरोबरच शेट्टी यांना विरोध होणारा दुसरा मुद्दा वस्रोद्योगाचा आहे. त्यावरही शेट्टी यांच्याकडून वस्रोद्योगासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी आणला असून, वस्रोद्योगाच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी केंद्रीय मंत्र्यांकडे फेºया मारल्याचेही सांगितले जात आहे. तसेच या प्रयत्नाला केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही शेट्टी यांनी जाहीर सभेत केला आहे.सुरुवातीपासून विरोधकांनी या दोन्ही मुद्द्यांवर शेट्टींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेट्टींच्या बाजूने असणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादी, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल यांनी हे दोन्ही मुद्दे खोडून काढत वारणा योजनेतील राजकारणाचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे. परिणाम, निवडणुकीच्या सुरुवातीला पूर्णत: शेट्टीविरोधी निर्माण झालेले वातावरण काही प्रमाणात बदलण्यास यश मिळेल, असे दिसत आहे.इतर मतदारसंघांपेक्षा इचलकरंजी मतदारसंघात आपणास मोठे लीड मिळू शकते, या भावनेने या मतदारसंघाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करणाºया धैर्यशील माने यांना शेट्टीविरोधी वातावरण कायम ठेवण्यासाठी व त्याचा फायदा स्वत:ला करून घेण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. माने यांना आमदार हाळवणकर यांची साथ मिळत असल्याने त्यांच्यासोबत शिवसेनेची सांगड घालून प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली असून, कॉर्नर सभा व मोठ्या प्रचार सभा यांचेही नियोजन केले आहे.हाळवणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीत त्यांनी आपला संपूर्ण गट व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बुथलेवल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तर शेट्टी यांना पाठबळ देत प्रकाश आवाडे यांनी आपल्या गटासह महाआघाडीतील नेत्यांना एकत्रित करून ग्राऊंड लेवल प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी नियोजन केले आहे.जांभळे गटाचा शेट्टींना पाठिंबाजांभळे गटाचे प्रमुख असलेले अशोकराव जांभळे यांना माजी खासदार बाळासाहेब माने यांनी आमदार केले होते. त्यामुळे ते सरुवातीपासून माने गटाशी एकनिष्ठ आहेत. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेस गटातून ते पवार यांच्याशीही जोडले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते सुरुवातीला कोणाच्या बाजूने पूर्ण क्षमतेने उतरले नव्हते. तसेच माने यांनी पक्ष बदलताना आपणास विचारात घेतले नसल्याची सलही त्यांच्या मनात आहे. त्यामुळे जांभळे यांच्यासह त्यांच्या गटाने शेट्टी यांना पाठिंबा देत प्रचार सुरू केला आहे.