शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होऊ नये यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:10 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देमोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होऊ नये यासाठी प्रयत्न मुंबईच्या धर्तीवर शासनाकडून मंडळांना गृहराज्यमंत्री देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी येथे सांगितले.मुंबईच्या लालबागच्या राजाने मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बोलताना राज्यमंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व गणेश मंडळांशी संवाद साधला.

सर्वच मंडळांनी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन उत्सव साजरा करणार नाही असे सांगितले आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. आता त्याच धर्तीवर राज्यभरातील इतर शहरे व ग्रामीण भागांतील गणेश मंडळाना आवाहन केले आहे. मुंबईच्या निर्णयाचे अनुकरण करावे अशा सूचना देण्याबरोबरच तसे आदेशही येत्या काही दिवसांत काढले जाणार आहेत.कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्यातील आर्थिक घडी विस्कटली आहे. झालेली तूट भरून काढण्यासाठी, नव्या उपाययोजना सुचविण्यासाठी वित्त विभागाने अभ्यास समिती नियुक्त केली आहे. त्यांच्या सूचनांनुसार अर्थचक्र रुळांवर आणण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहेत, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.पडळकर यांचा विषय संपलाआमदार गोपीचंद पडळकर यांचा विषय शरद पवार यांनीच संपवला आहे. आता त्यांना महत्त्व देऊ नये. पडळकर यांच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.उस्मानाबाद प्रकरणी कारवाई होणारउस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यात निवृत्तीबद्दल पोलिसांनी मिरवणूक काढून सहकाऱ्याला निरोप दिला. सर्व नियम पोलिसांनीच पायदळी तुडवल्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.शेतकरी गटाच्या मालकीचे कोल्ड स्टोअरेज स्थापणारबेदाणा, गुळासारख्या शेतमालाच्या साठवणुकीसाठी सध्या खासगी कोल्ड स्टोअरेजचा आधार घ्यावा लागत आहे; पण येथून पुढे शेतकरी गटाच्या मालकीची कोल्ड स्टोअरेज स्थापन करण्यासाठी बाजार समित्यांना जागांचे सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्यमंत्री देसाई यांनी सांंगितले.पैसे घेऊन पास देणाऱ्यांवर कारवाईएक हजार रुपये घेऊन ई-पास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्री देसाई यांनी मुंबईतील रॅकेट पूर्णपणे मोडून काढले आहे, त्याच धर्तीवर कोल्हापुरातही असेच घडत असल्यास कडक कारवाई करा असे बजावले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एकावर निलंबनाची कारवाई केली आहे. कुणालाही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरShambhuraj Desaiशंभूराज देसाई